राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बारामती येथे विज्ञान आणि नावीन्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. ‘बारामती अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान केंद्र उभारण्यात आलं आहे. दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोहित पवार यांनी अदानींचं सारथ्य केल्याने भाजपाकडून टीका होत आहे. भाजपाच्या या टीकेला रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.

अदानींसाठी रोहित पवार झाले ‘ड्रायव्हर’, भाजपा नेत्याने लगावला टोला; म्हणाले “मोदींना लक्ष्य करणाऱ्या बगलबच्च्यांना…”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…

रोहित पवारांनी नवी मुंबईत ‘स्वराज्याचे पुनरागमन’ या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गौतम अदानींसाठी गाडी चालवण्यावरुन होणाऱ्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने करत असतो. लपवून छपवून बाकी करतात तसं करत नाही. जर एखादा व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येत असेल आणि त्यांच्यासाठी आपण गाडी चालवली असेल तर त्यात गैर काय?”.

प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान केंद्र – अजित पवार; बारामतीत विज्ञान, नावीन्यता केंद्राचे शरद पवार, अदानींच्या उपस्थितीत उद्घाटन

“या घटनेवरून भाजपाचे लोकं जे पतंग उडवताहेत ते त्यांनी उडवू नये. त्यांना तेवढंच कळतं. गौतम अदानींची गाडी चालवत असेन आणि त्याची चर्चा होत असेल तर होऊद्यात,” असंही ते म्हणाले. शरद पवारांनी आपल्या पुस्तकातही आपण अदानींना खूप वर्षांपासून ओळखतो असं सांगितलं असल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.

नेमकं काय झालं होतं?

गौतम अदानी यांचं स्वागत करण्यासाठी रोहित पवार स्वत: बारामती विमानतळावर उपस्थित होते. गौतम अदानी विमानतळावर उतरल्यानंतर रोहित पवार यांनी त्याचं स्वागत केलं. त्यानंतर रोहित पवार यांनी गौतम अदानी यांची गाडी स्वत: चालवत त्यांना विज्ञान केंद्रापर्यंत नेलं. यानंतर रोहित पवारांचे गाडी चालवतानाचे व्हिडीओ आणि फोटो चर्चेचा विषय ठरले होते.

अतुल भातखळकरांची टीका

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला होता. “अदानी आणि अंबानींवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांना आमदार रोहित पवार यांनी आपल्या कृतीनेच उत्तर दिले आहे,” असा टोला अतुल भातखळकरांनी लगावला होता.

“अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात. किती हा नम्रपणा,” अशी उपहासात्मक टिप्पणीही त्यांनी केली आहे.

या कार्यक्रमाला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत, डॉ. सी. डी. माई, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील, होमी भाभा विज्ञान आणि संशोधन केंद्राचे डॉ. अर्णव भट्टाचार्य, नेहरू विज्ञान केंद्राचे डॉ. सुब्रत चौधरी, तरुण वैज्ञानिक गोपाली जी., ‘अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे चेअरमन राजेंद्र पवार, प्रीती अदानी आदी उपस्थित होते.