राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नेतृत्व करतात. रोहित पवार सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रोहित पवारांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एक किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मराठी किडा’ या युट्यूब चॅनेलला रोहित पवारांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. वैयक्तिक आयुष्याबरोबरच राजकीय जीवनातील विविध मुद्द्यांवर रोहित पवारांनी या मुलाखतीत भाष्य केलं. “राजकीय जीवनात नागरिकांशी संवाद साधताना असा एखादा प्रसंग घडला आहे का, ज्यामुळे तुम्हालाच हसू आलं?” असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित पवारांनी एक किस्सा शेअर केला.

हेही वाचा>> “शरद पवार आणि तुमचं नेमकं नातं काय?” रोहित पवार उत्तर देत म्हणाले…

रोहित पवार म्हणाले, “लोक येतात, भेटतात, फोटोही काढतात. पण कधी कधी फार महत्त्वाचं काम आहे असं सांगून सेल्फी काढणारे लोकही मला भेटलेले आहेत. एक मुलगी आवडते, असेही फोन मला येतात. पण तिला कोणीतरी दुसरं आवडतं. मला का सांगतोय, असं विचारल्यावर ती मुलगी तुम्हाला फॉलो करते असं सांगतात. तुम्ही तिला सांगितल्यावर ती कदाचित तिचं मन बदलेल. अशीही काम आमच्याकडे येतात, पण ही काम मी करत नाही. असे फोन आल्यानंतर मी मनसोक्त हसून घेतो.”

हेही वाचा>> “तुमची आवडती अभिनेत्री कोण?” रोहित पवार उत्तर देत म्हणाले, “मला…”

रोहित पवारांच्या या वक्तव्यावर “आवडली की सांगा आम्ही उचलून आणू, असं तुम्ही म्हणता का” असं मुलाखतकाराने विचारलं. त्यावर रोहित पवार म्हणाले, “काही लोक असतात जे जोशमध्ये बोलून जातात. मुंबईतील एक आमदार असं म्हणालेले, आम्हाला कळलं.”

हेही वाचा>> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटेच का दिसतात? रोहित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी ट्विटरवर #AskRohitPawar सेशन घेतलं होतं. यामध्ये एका तरुणीने रोहित पवारांना “दादा माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. आम्ही दोघं लग्नही करणार आहोत. पण मुलाच्या घरचे आमच्या लग्नाला तयार होत नाहीयेत. त्यामुळे आम्ही दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला आहे. तुमच्या मते मी काय करू?” असा प्रश्न विचारला होता. तरुणीच्या या प्रश्नावर रोहित पवारांनी “पळून जाण्यासाठी आई-वडिलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा,” असं उत्तर दिलं होतं. रोहित पवारांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp rohit pawar said once young mens call and ask to request girl whom he like kak