सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली. फलटण येथे रामराजे यांचे चुलत बंधू संजीवराजे यांचे निवासस्थान आणि त्यांच्या व्यवसायावर नुकतीच प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकत चौकशी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व दिले जात आहे.
संजीवराजे यांच्या निवासस्थानी झालेव्या कारवाईनंतर रामराजे गट अस्वस्थ झाला आहे. रामराजे सध्या जरी राष्ट्रवादी (अजित पवार ) पक्षात असले तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी या गटाने महायुतीपासून फारकत घेतली होती. या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या बंधूंची झालेली चौकशी चर्चेत आली होती. तब्बल पाच दिवस ही चौकशी सुरू होती. ही संपल्यावर आज रामराजे यांनी अजित पवार यांची मंगळवारी भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली असली तरी त्याचे तपशील समजू शकले नाहीत.