सांगली : विधानपरिषद निवडणुकीमध्ये पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आपण मतदान केले असून कुणाच्या तरी चुकीचे खापर आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

हेही वाचा >>> Vishalgad : “हा खरंच शिवाजी महाराजांचा किल्ला आहे?” विशाळगडाची अवस्था पाहून संभाजीराजेंचा प्रश्न; म्हणाले, “स्थानिक लोकप्रतिनिधींनी…”

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या बाराही आमदारांनी शेकापचे जयंत पाटील यांना मतदान केले असल्याचे सांगून आमदार नाईक म्हणाले, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिलेल्या क्रमानुसारच आपण मतदान केले आहे. तरीही आमच्या पक्षाचे एक मत मिळाले नसल्याचा शेकापचा आरोप म्हणजे कुणाच्या तरी चुकीचे खापर मारण्याचा प्रकार आहे. याबाबत आ. पाटील यांनीही जाब विचारला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या आमदार नाईक यांनी आपणास मतदान केले नसल्याचा आरोप शेकापकडून झाला होता. याबाबत आ. नाईक यांची भूमिका आणि बाजू समोर आलेली नव्हती. आज आ. नाईक जिल्हा बँकेत आल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.

Story img Loader