NCP Sharad Pawar faction criticized : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती येथे जन सन्मान मेळावा आयोजित करून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये आज पहिला मेळावा घेण्यात आला. मेळाव्यादरम्यान पावसाचीही हजेरी पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पावसात भाषण करत असताना इतर नेत्यांनी त्यांच्या बाजूला गराडा घातल्याचे दिसले. लोकसभेत केवळ एकच खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या उपयुक्ततेबाबत जोरदार चर्चा झाली होती. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून अजित पवार यांची कोंडी करण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार गटाने विधानसभेसाठी आतापासूनच कंबर कसल्याचे दिसत आहे. मात्र आजच्या सभेवर शरद पवार गटाकडून बोचरी टीका करण्यात आली आहे. सभेत अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या राहिल्या होत्या. सभेतल्या रिकाम्या खुर्च्या तुमचे भविष्य आहे, अशी टीका शरद पवार गटाने केली आहे.

शरद पवार गटाकडून व्हिडीओ पोस्ट

अजित पवार गटाने जन सन्मान मेळाव्याला ऐतिहासिक सभा असल्याचे संबोधले होते. लोकसभेत बारामती विधानसभेतून सुनेत्रा पवार यांना लीड मिळाले नव्हते. त्यामुळे पहिलीची सभा बारामतीमध्ये घेण्यात आली. पण या सभेला म्हणावी तशी गर्दी झाली नसल्याची टीका शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स हँडलवरून करण्यात आली आहे.

hm amit shah instructions to distribute seats according to ability to win assembly elections
जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच जागावाटप; अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना बजावले
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
maharashtra minister chandrakant patil come down on road to fill potholes in city pune
चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘कोथरूड’मध्ये ‘खड्डे’ बुजविण्याची दक्षता; हे सर्व निवडणुकीसाठी असल्याची विरोधकांची टीका
CM bhagwant mann AAP Punjab
Punjab AAP: मोफत देण्याच्या घोषणा ‘आप’च्या अंगलट; पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावरही कर
mla sudhir gadgil marathi news
सांगली: सुधीर गाडगीळ यांची निवडणुकीतून माघार, कार्यकर्त्यांकडून फेरविचाराची मागणी
Sharad Pawar and Devendra Fadnavis
Harshvardhan Patil : देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांचा धक्का? निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ भाजपा नेता तुतारी हाती घेण्याच्या चर्चांना उधाण

“महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे ती अहंकार, फंद फितुरी, फसवणूक आणि गद्दारीला क्षमा करत नाही… हेच लोकसभेच्या निकालात दिसलं. आजच्या बारामतीतील ‘ऐतिहासिक सभे’चं चित्र खूप बोलकं आहे… ज्या सभेला तुम्ही ‘ऐतिहासिक’ म्हणताय त्या सभेतील रिकाम्या खुर्च्या तुमचं भविष्य सांगत आहेत. महाराष्ट्र अजूनही तुमच्या गद्दारीला स्वीकारायला तयार नाही!”, अशी पोस्ट टाकत शरद पवार गटाने मोकळ्या खुर्च्यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे वाचा >> Ajit Pawar : “निवडणुकीत हौशे, नवशे, गवशे येतील अन्…”, बारामतीतून अजित पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं

अजित पवार सभेत काय म्हणाले?

अजित पवार जन सन्मान मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वेगळे वातावरण तायर करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी अशा प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, तुम्ही घोषणा देण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांचे माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून झाले आहेत का? हे तपासा. आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. ही जन सन्मान रॅली आता केवळ बारामतीमध्ये थांबणार नाही. तर यापुढे प्रत्येक जिल्हा, तालुक्यात आम्ही जाणार आहोत.

अजित पवार पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती निवडून आली तरच आपली ही योजना (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना) पुढे कायम चालत राहील. आपलं (महायुतीचं) सरकार आलं तरच आपल्याला कायम पैसे मिळणार ही भावना लोकांमध्ये जागृत व्हायला हवी. आता निवडणुकीच्या काळात हौशे, नवशे, गवशे येतील, ते तुम्हाला काहीही सांगण्याचा प्रयत्न करतील. परंतु, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, हा अजित पवार शब्दाचा पक्का आहे. शब्द कुठेही बदलणार नाही. मी तुम्हा सर्वांना आश्वासन देतोय.

हे ही वाचा >> आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी संबंध? १२ लाखांचा धनादेश…

छगन भुजबळ शरद पवारांवर बरसले

दरम्यान याच सभेत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. “आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न राज्यात प्रलंबित आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो सोडवला पाहिजे. तुमचे वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले आहे? हे सगळे मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते. त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

Jitendra Awhad Answer to Chhagan Bhujbal
जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड यांचे भुजबळांना प्रत्युत्तर

“महाराष्ट्राच्या राजकारणात जोपर्यंत शरद पवार यांचं नाव घेत नाही तोपर्यंत आपली काही किंमत राहणार नाही, हे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या राजकारण्यांना माहीत आहे. आम्हाला बैठकीसाठी कुणाचाही फोन आला नाही. शरद पवारांना या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची कामे आहेत. तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला फोन केलात का? जयंत पाटलांना फोन केलात का? प्रतोद म्हणून मला सांगितले का? पण तुम्ही वैयक्तिक फोन केलात. पण सरकारतर्फे फोन आला नाही. वैयक्तिक फोन करताना देखील तुम्ही जितेंद्र ओबीसींची बाजू आपल्याला लावून धरायची आहे, यासाठी केला होता. ओबीसी विरुद्ध मराठा हे झुंझवण्याची मला इच्छा नाही. मी हे पहिल्यापासून सांगत आलो आहे”, असे जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिले.