NCP Sharad Pawar faction criticized : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती येथे जन सन्मान मेळावा आयोजित करून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये आज पहिला मेळावा घेण्यात आला. मेळाव्यादरम्यान पावसाचीही हजेरी पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पावसात भाषण करत असताना इतर नेत्यांनी त्यांच्या बाजूला गराडा घातल्याचे दिसले. लोकसभेत केवळ एकच खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या उपयुक्ततेबाबत जोरदार चर्चा झाली होती. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून अजित पवार यांची कोंडी करण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार गटाने विधानसभेसाठी आतापासूनच कंबर कसल्याचे दिसत आहे. मात्र आजच्या सभेवर शरद पवार गटाकडून बोचरी टीका करण्यात आली आहे. सभेत अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या राहिल्या होत्या. सभेतल्या रिकाम्या खुर्च्या तुमचे भविष्य आहे, अशी टीका शरद पवार गटाने केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा