राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले आहे. या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीवर आणि त्यांना मदत करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली. २०१९ साली अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी बसविणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वात मोठी चूक होती. कारण एकदा गद्दारी करणारा माणूस हा नेहमी गद्दारच असतो, अशा शब्दात आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्र सोडले. तसेच शरद पवार यांना आवाहन करतो की, यांच्या वाटा आता बंद करा, त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका, असे आवाहनही आव्हाड यांनी केले.

हे वाचा >> ‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी..’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान; म्हणाले, “वेद, मानववंशसास्त्राचा अभ्यास…”

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

“मला अजित पवारांकडून काही मिळालेले नाही, यापुढे मला त्यांच्याकडून काही घ्यायचेही नाही, त्यामुळे मी त्यांच्यावर खुलेपणाने टीका करत आहे. कारण मला परत त्यांच्याकडे जायचे आहे. पण मी शरद पवारांना एकच विनंती करेन की, आता वाटा बंद करा. यांना परत घेऊ नका. काही काही गोष्टी कार्यकर्त्यांच्या मनातले बोलावे लागेल”, असे सांगून आव्हाड यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, “अजित पवार पक्षात होते, तोपर्यंत आम्ही त्यांची दादागिरी सहन केली. कारण शरद पवार यांना वाईट वाटेल म्हणून आम्ही शांत राहिलो. यापुढे जेव्हा जेव्हा ते टीका करतील, तेव्हा त्यांना एका मिनिटांत प्रत्युत्तर दिले जाईल.” अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेते पवारांच्या वयावर कसे काय टीका करू शकतात? त्यांच्यातले दिलीप वळसे पाटील आंबेगाव ते मुंबई मॅरेथॉन धावत येतात का? अशा खोचक प्रश्न उपस्थित करून आव्हाड यांनी वळसे पाटील आणि अजित पवार यांच्यावर टीका केली.

तटकरे साहेब, जे पेराल तेच उगवेल..

अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही आव्हाड यांनी टीका केली. ते म्हणाले, तटकरे यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे पद होते. त्यांना अजून काय द्यायचे बाकी होते? अजित पवार यांनी तटकरेंच्या मैत्रीखातर मला पालकमंत्री पद न देता त्यांच्या मुलीला पालकमंत्री केले. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मला बाजूला करून सांगितले होते की, जितेंद्र मला पालघर नको होते, मी रायगड मागितले होते. पण अजित पवार यांनी मित्राला रायगड दिले. त्यामुळे तुला पालघर जिल्हा मिळू शकला नाही.

हे वाचा >> “एकनाथ शिंदे मला भेटून म्हणाले होते ‘जितेंद्र खास तुझ्यासाठी…”, आव्हाडांचा दावा; अजित पवारांवर केला ‘हा’ आरोप!

“सुनील तटकरे २०१९ च्या बंडावेळी सिल्व्हर ओकवर होते. पण २०२३ च्या बंडामध्ये अजित पवारांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाण्यात सर्वात मोठा हात तटकरे यांचा होता. तटकरे यांनी पवारांचे घर फोडले, पण आज त्यांच्या घरात काय होत आहे? त्यांच्या घरात भावा-भावांमध्ये कलह आहे. तुम्ही जे पेराल, तेच उगवेल”, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

प्रफुल पटेल भाजपामध्ये जाण्यासाठी उताविळ

अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासहीत प्रफुल पटेल यांच्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. पटेल २०१४ सालीच भाजपामध्ये जाण्यासाठी शरद पवार यांच्या मागे लागले होते. तरीही शरद पवार यांनी बाहेर हे कधीच सांगितले नाही, हा त्यांचा चांगुलपणा आहे. २०१४ पासून जे जे नेते भाजपामध्ये गेले, तो प्रत्येक नेता शरद पवारांना येऊन भाजपामध्ये जाण्याची गळ घालत होता.

Story img Loader