अजित पवार यांनी बारामती येथे आज पुन्हा एकदा बारामतीकरांना भावनिक आवाहन केलं, या आवाहनावर बोलत असताना रोहित पवार म्हणाले, “हे बदललेले दादा आम्हाला ओळखता येत नाहीत. पूर्वीचे दादा वेगळे होते. शेतकरी, युवकांवर अन्याय झाल्यानंतर दादा तात्काळ बोलत होते, जे योग्य वाटते, ते रोखठोकपणे मांडणारे दादा मला माहीत होते. मोठ्यांचा आदर करणारे दादा आम्हाला माहीत होते. पण हे नवीन दादा भाजपात गेल्यानंतर त्यांची भाषा बोलू लागले आहेत. हे दादा सत्तेत असून शेतकऱ्यांविषयी, युवकांविषयी बोलत नाहीत. थोरा-मोठ्यांचा मान ते ठेवत नाहीत”, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

साताऱ्यात कृषी प्रदर्शनासाठी रोहित पवार आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार आणि पुरोगामी नेत्यांवर प्रेम करणारा हा सर्व परिसर आहे. इथल्या नेत्यांमध्ये बदल झालेला असला तरी लोकांमध्ये काहीही बदल झालेला नाही. आगामी निवडणुकीत नेते विरुद्ध सामन्य माणूस आणि सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये थेट लढत होईल, असे वाटत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
ajit-pawar on sharad pawar
Ajit Pawar on Sharad Pawar : “ते ८५ वर्षांचे अन् मला रिटायर करायला निघालेत”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा
Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!

हे वाचा >> अजित पवारांचे बारामतीकरांना पुन्हा भावनिक आवाहन; म्हणाले, “सख्ख्या भावाच्या घरी जन्मलो..”

भाजपाला ६० वर्षांत जमलं नाही, ते जवळच्या लोकांनी केलं

रोहित पवार पुढे म्हणाले की, भाजपाला जे ६० वर्षांत जमलं नाही, ते जवळच्या लोकांना वेगळं करून पवारां-पवारांमध्ये वाद निर्माण करण्यात ते नक्कीच यशस्वी ठरताना दिसत आहेत. पण हा लढा सामान्य माणूस विरुद्ध लाभार्थी असा होणार आहे.

‘सेल्फी घेऊन, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत’, अजित पवारांकडून सुप्रिया सुळे लक्ष्य

आज बारामतीमध्ये भाषण करत असताना अजित पवार यांनी लोकसभेला उमेदवार देण्याबाबत सुतोवाच केले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. माझ्या घरातले इतर लोक माझ्या विरोधात गेले तरी ही जनता माझ्यासोबत आहे. प्रत्येकाला प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण मला एकटं पाडण्यासाठी कसे काहीजण जीवचं रान करतात ते बघा,” असा टोला अजित पवार यांनी लगावला होता.

सेल्फी घेऊन, संसदेत भाषणं करून कामं होत नाहीत

“आपल्याला बारामतीचा, महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे. यासाठी नुसता खासदार निवडून द्यायचा आणि त्याने संसदेत फक्त भाषणं करायची, यातून प्रश्न सुटत नाहीत. मी मतदारसंघात न येता, मुंबईत बसून उत्तम संसदपटू म्हणून खिताब मिळविला असता तर मतदारसंघातील कामं झाली असती का? नुसतं सेल्फी घेऊन कामं होत नसतात”, अशा शब्दात अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका केली.