Jayant Patil On Devendra Fadnavis : बदलापूरमध्ये एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर १३ ऑगस्ट रोजी लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यानंतर संतापलेल्या नागरिकांनी आज (२० ऑगस्ट) बदलापूर रेल्वे स्थानकामध्येही रेल्वे रोको आंदोलन करत शाळेचीही तोडफोड केली. या आंदोलनामुळे जवळपास ९ तासापांसून अधिक वेळ रेल्वेसेवा ठप्प होती. यानंतर राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, बदलापुरातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी वेळ नाही”, अशी खोचक टीका त्यांनी केली.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

हेही वाचा : “ठराविक लोकांना इथं सोडलं”, बदलापूरच्या आंदोलनावरून गिरीश महाजनांचा विरोधकांवर गंभीर आरोप

जयंत पाटील काय म्हणाले?

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी वेळ नाही. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. याबाबत त्यांना फारसं सोयरसुतक नाही. फक्त सत्ता कशी आणायची? याकडे त्यांचं सर्व लक्ष आहे. देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी मोठी आहे, कारण त्यांच्या भरोवशावर दोन पक्ष अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांच्यात आणि यांच्यामध्ये जास्त काही ताळमेळ नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून महाराष्ट्रातील प्रश्न आणि बदलापूर सारख्या गंभीर घटनांकडे बघण्यासासाठी त्यांच्याकडे वेळ राहिला नाही, असं मला दिसत आहे”, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.

“महाराष्ट्रातील महिलांचं देखील असं म्हणणं आहे की राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्हाला देण्यात येणार असलेले १५०० रुपये नको. मात्र, आम्हाला सुरक्षितता द्या. पण महिलांना सुरक्षितता देत असताना राज्यातील कायदा व सुव्यस्था राखण्यास हे महायुतीचं सरकार अपयशी ठरत आहे”, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

नवाब मलिकांवरून फडणवीसांवर टीका

“भारतीय जनता पक्षाचं काहीच खरं नसतं. एकदा त्यांनी ७० हजार कोटींचा आरोप केला. पुढे त्याच लोकांबरोबर सरकार स्थापन केलं. आता नवाब मलिक यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अतिशय गंभीर आरोप केले होते. आता त्याच नवाब मलिक यांना महायुतीत एक जागा देतील अशी परिस्थिती आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपालाही मान्य असेल, असं गृहीत धरता येईल. कारण नवाब मलिक यांच्या मतदारसंघात काल मोठा कार्यक्रम पार पडला”, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपावर केली.

Story img Loader