Uttamrao Jankar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला. तसेच यावरून उत्तम जानकर यांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. यानंतर आता उत्तम जानकर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. आता आमदार उत्तम जानकर यांनी मोठा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. “२३ जानेवारी रोजी आपण आमदारकीचा राजीनामा दिल्लीत निवडणूक आयोगाकडे देणार आहे”, असं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच माळशिरस मतदारसंघात बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घेण्यात यावी अन्यथा आम्ही दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचंही जानकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

उत्तम जानकर काय म्हणाले?

“ईव्हीएमच्या मुद्याला मारकडवाडीत गावातून सुरुवात झाली आणि तोच आक्रोश संपूर्ण माळशिरस तालुक्यात आहे. आता माळशिरस तालुक्यातील धानोरे या गावात देखील ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी १२०६ लोकांनी हात वरती करून मतदान केलं. पण त्या गावात मला ९६३ एवढेच मते दाखवण्यात आलेली आहेत. आता धानोरे गावातील १२०० लोकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत आणि धानोरे गावातील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. आता जर निवडणूक आयोग मतदानाची पडताळणी करणार नसेल तर २३ जानेवारी रोजी मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे”, असं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Will the post of CIDCO Board Chairman be changed soon
सिडको मंडळाच्या अध्यक्षपदाचा लवकरच खांदेपालट?
Hasan Mushrifs statement regarding post of Guardian Minister of kolhapur
पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जायचंय – हसन मुश्रीफ
Santosh Deshmukh murder case All party pressure Dhananjay Munde Question on judicial inquiry
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय दबाव,राज्यपालांची भेट; न्यायालयीन चौकशीवर प्रश्न
loksatta readers feedback
लोकमानस: सारेच बरबटलेले, कोणाला वगळणार?

उत्तम जानकर आणि बच्चू कडू दिल्लीत आंदोलन करणार

“आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर २५ जानेवारी रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर मी (उत्तम जानकर) आणि बच्चू कडू आम्ही आंदोलन करणार आहोत. तसेच माझ्या मतदारसंघाची पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी आमची मागणी आहे. मात्र, जर निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी मान्य केली नाही तर आम्ही दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहोत. दिल्लीत देखील अशाच प्रकारचा ईव्हीएमचा विषय सुरु आहे. त्यामुळे आमच्याबरोबर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होतील”, असंही आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे.

राजीनामा देण्याबाबत शरद पवारांची भूमिका काय?

“धानोरे गावातील १२०० लोकांनी प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावाने दिलेलं आहे. तसेच मारकडवाडीच्या १४६६ लोकांनी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. हे प्रतिज्ञापत्र आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहोत. त्यानंतर आंदोलन करणार आहोत. देशात निवडणूक पारदर्शी व्हावी अशी राहुल गांधी यांची देखील भूमिका आहे. मी राजीनामा देणार याविषयी अद्याप शरद पवार यांच्याशी बोललो नाही. मात्र, मी त्यांच्याशी बोलून २३ जानेवारी रोजी राजीनामा देणार आहे”, असं उत्तम जानकर यांनी म्हटलं.

Story img Loader