Nilesh Lanke: भाजपाचे नेते राम शिंदेंना खासदार निलेश लंकेंनी ( Nilesh Lanke ) थेट इशाराच दिला आहे की काहीही करा पण शरद पवारांचा नाद करु नका. कर्जत-जामखेडमध्ये निलेश लंके बोलत होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांचं राजकारणातलं महत्त्व अधोरेखित केलं. भाजपाचे नेते राम शिंदे यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे सल्लाच देऊन टाकला. कर्जत तालुक्यातल्या मिरगाव या ठिकाणी आमदार रोहित पवार यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान करण्यात आला. त्या भाषणात खासदार निलेश लंकेंनी ( Nilesh Lanke ) हा सल्ला राम शिंदेंना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले निलेश लंके? ( What Nilesh Lanke Said?)

“आमदार, खासदार झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात रस्ते झाले पाहिजेत, ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे यापेक्षा वेगळा विचार कुणी करत नाही. पण रोहित पवार सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत काहीतरी गेलं पाहिजे, या हेतूने काम करत आहेत. मला इथल्या लोकांनीच हे सांगितलं. आपल्याला असा आमदार मिळाला हे तालुक्याचं, जिल्ह्याचं भाग्य आहे. ग्राऊंड लेव्हलला जाऊन काम करणारा माणूस म्हणजे रोहित पवार. एखादा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला तरीही रोहित पवार आपुलकीने जाऊन चौकशी करतात.” असं निलेश लंके ( Nilesh Lanke ) म्हणाले.

हे पण वाचा- अजित पवार यांनी सांगितलंं सिक्रेट, “निलेश लंकेंनी ‘त्या’ अटीवर माझ्याकडून लोकसभा लढण्याची..”

भाजपा नेते राम शिंदेंना सल्ला

आपल्या भाषणात निलेश लंके ( Nilesh Lanke ) म्हणाले, “मी नेहमी सांगत असतो की कुणाचाही नाद करावा, पण पवारांचा नाद करु नये. कर्जत जामखेडमध्येही कुणाच्या डोक्यात काही असेल तर आत्ताच त्यांनाही सांगतो, हात जोडून विनंती करतो नाद करा पण पवारांचा नाद करु नका. अन्यथा तुमचं राजकीय नुकसान करुन घ्याल. पवार म्हणजे पॉवर आणि पॉवर म्हणजे पवार.” असं म्हणत निलेश लंके यांनी भाजपा नेते राम शिंदेंनाच नाव न घेता सल्ला दिला आहे.

खासदार निलेश लंके यांनी कर्जत या ठिकाणी भाषण करताना भाजपाचे नेते राम शिंदे यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. कुणाचाही नाद करा पण पवारांचा नाही असं निलेश लंकेंनी म्हटलं आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

रोहित पवार मोठ्या फरकाने पुन्हा निवडून येतील

निलेश लंके ( Nilesh Lanke ) त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले, “बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचं काम रोहित पवारांनी केलं. महाराष्ट्रात सर्वात जास्त डिजिटल शाळा माझ्या कर्जत-जामखेडच्या मतदारसंघात आहेत. आपण उपजिल्हा रुग्णालायचं त्याठिकाणी भूमीपूजन करत आहोत. महाविकास आघाडीच्या काळात सर्वात जास्त निधी आणण्याचं काम रोहित पवारांनी केलं. आम्ही सुद्धा आमदार होतो, आम्हाला अंदाज पण येऊ देत नव्हते. कोणाला वाटतं असेल उलटपालटं करु. पण तसं काही होत नसतं तु्म्ही काळजी करु नका. ८० हजार ते एक लाख मतांहून अधिक मताधिक्य रोहित पवारांना मिळेल, तेही केवळ रोहित पवारांच्या कामामुळे मिळेल” असा विश्वास निलेश लंकेंनी व्यक्त केला.