Supriya Sule On Mahayuti : विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. राज्यातील विविध मतदारसंघात नेत्यांनी दौरे करत आढावा घेत आगामी रणनीती आखली आहे. दौऱ्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीच्या सभांचा धडाका सुरु आहे. अशातच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची राज्यभरात चर्चा रंगली होती. या सिनेट निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर शुक्रवारी (२७ सप्टेंबर) मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला.

या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या युवासेनेने आपलं वर्चस्व कायम राखलं. १० पैकी १० जागा युवासेनेने जिंकल्या तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला एकही जागा जिंकता आली नाही. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युवासेनेचं कौतुक करत राज्यातील सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सत्ताधाऱ्यांनी अशाच पद्धतीने अडवून धरल्या आहेत. पण जेव्हा या निवडणुका होतील तेव्हा जनता चोख उत्तर देईल”, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे.

sharad pawar loyalist jayant patil criticized amit shah narendra modi
मोदी व शहा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष त्यांच्याकडे  घेतले – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Party President Mallikarjun Kharge met by Nana Patole Print politics news
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला; नाना पटोलेंकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट
Congress complains to Governor about law and order neglecting farmers print politics news
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, कायदासुव्यवस्था ढासळली; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार
uttar pradesh bypoll
UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?
minister abdul sattar supporters protest agains raosaheb danve for pakistan remark on sillod
मंत्री सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यातील वाद टोकाला
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
Sharad Pawar
Sharad Pawar : “मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग…”, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

हेही वाचा : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा १० जागांवर विजय, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “इथूनच विजयाचा…”

सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं?

“मुंबई विद्यापीठाच्या सीनेट निवडणुकीत युवासेनेच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. ही निवडणूक सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सत्ताधाऱ्यांनी अशाच पद्धतीने अडवून धरलेल्या आहेत. जेव्हा या निवडणुका होतील तेंव्हा जनता त्यांना चोख उत्तर देईल. युवासेना आणि सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंकडून युवासेनेचं कौतुक

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा (Mumbai University Senate Election) शुक्रवारी (२७ सप्टेंबर) निकाल लागला. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) युवासेनेने जोरदार मुसंडी मारली. या सिनेट निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचा १० पैकी १० जांगावर विजय झाला तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (ABVP) एकही जागा जिंकता आली नाही. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेच्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.