२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकी करण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीशकुमार यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, विरोधी पक्षांमधील नेत्यांमध्ये चर्चा घडवण्यासाठी मोलाची भूमिका निभावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंबंधी भाष्य केलं आहे. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ मध्ये विरोधी पक्ष एकत्रित लढेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “एकत्रित काहीतरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेलं नाही. नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मतं मांडली आहेत. मात्र अद्याप त्यांचं निर्णयात रुपांतर झालेलं नाही”. काँग्रेस यामध्ये अडसर ठरत नसल्याचंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा काही संशय आहे का? रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंनाही लक्ष्य

“काँग्रेसला सोबत घेऊ नये असं काहींचं म्हणणं आहे. पण मला वाटतं, कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचं जाही केल्यासंबंधी विचारलं असता, आमच्या शुभेच्छा आहेत असं शरद पवार म्हणाले. रामदास कदम यांनी उद्दव ठाकरे सोनिया गांधी, शरद पवार यांच्या नादी लागून बिघडले अशी टीका केल्यासंबंधी विचारलं असता, ‘कोण बोलतंय, कोण आरोप करतंय याची नोंद घेतली पाहिजे’ असा टोला लगावला.

“कारण नसताना संजय राऊत यांना तुरुंगात टाकलं आहे आणि आम्ही वाऱ्यावर सोडलं असं बोलत आहेत. हा सत्तेचा गैरवापर आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना विनाकारण जेलमध्ये टाकलं आहे,” असा आरोप शरद पवारांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar on pm narendra modi 2024 lok sabha election solapur sgy
Show comments