सावंतवाडी : शिव पुतळा कोसळला, महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात शिवप्रेमींच्या तीव्र भावना आहेत. त्याचे प्रायश्चित्त सरकारने घेतले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. मंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही, एखादा महिना आहे. त्यानंतर भ्रष्टाचारी सरकारला घालवायचे आहे, आमचे सरकार शिव पुतळा उभारेल अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी सावंतवाडी इथे पत्रकार परिषदेत दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राचे स्वाभिमान, दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत. याठिकाणी तडजोड नाही. पण या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही. सर्व कामात भ्रष्टाचार होतोय. हे इव्हेंट सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्यावर किंवा इव्हेंट करताना सरकारने तिजोरीतून खर्च केला आहे. महाराष्ट्र सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. यांनी केलेले सगळे प्रकल्प फसले आहेत. मोठमोठी टेंडर काढून इव्हेंट करणं यांचं काम असून हे सरकार इव्हेंटजीवी आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

हे ही वाचा… मालवणमध्ये कडकडीत बंद, महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा, मोठा पोलीस बंदोबस्त

मालवणला झालेली घटना दुर्दैवी आहे‌. काही महिन्यांपूर्वी उभा केलेला हा पुतळा कोसळला. वादळ, वारं नसताना हा पुतळा कोसळला. मोठं वादळ असतं तर झाडांचीही पडझड झाली असती. मात्र, तसं न होता केवळ पुतळा पडला. याचा अर्थ पुतळा सदोष होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करण्याचं काम सरकारने केले. आपटेंची कुवत नसाताना काम देणारा खरा दोषी आहे. दोन पुतळ्यांच्या वर त्यांनी कधी पुतळे केले नाहीत. त्यांना काम देणारा दोषी आहे. सरकारचे आपटेंना वाचावायचे प्रयत्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवताना कामाचा दर्जा उत्तम आहे का ? हे बघण्याचं तारतम्य महाराष्ट्र सरकारने बाळगायला हवं होतं. त्यामुळे आता नौदलावर न ढकलता महाराष्ट्राची व शिवप्रेमींची क्षमा राज्य सरकारने मागावी अशी टीका जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

हे ही वाचा… Maharashtra News Live : “यापुढे पोलिसांशी असहकार्य असेल”; नारायण राणेंची पोलिसांशी हुज्जत!

ते म्हणाले,आपटे शिल्पकाराचा पत्ता नौदलाला कसा समजला ? सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुढाकारातून हे सगळं झालेलं आहे. आपटे हा कल्याणचा निघाला. काम बांधकाम खात्यानेच करून घेतलं. पुतळा बसविण्याच काम नौदलाने केलं. दोष हा महाराष्ट्र सरकारचा आहे. पुतळा पडल्यावर गप्प बसून भाजपची आरती करावी का ? महाराष्ट्राचा सर्वोच्च अभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचा पुतळा उभा करताना सरकार काळजी घेत नाही. टेंडर न काढता वर्क ऑर्डर देतात. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. केवळ गुन्हे दोघांवर दाखल करून चालणार नाही. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पुतळा पडल्यावर आम्ही बोललो तर राजकारण करतो असं भाजप म्हणत आहे. चबुतऱ्याच्या फरशांवर बोललो असतो तर मोठा आवाज केला असता असा टोला हाणला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar party president jayant patil criticized mahayuti government in sawantwadi asj