सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत अकरापैकी सहा जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) सर्व उमेदवारांपुढे तुतारीसदृश ‘ट्रम्पेट’ चिन्ह घेऊन अन्य उमेदवार उभे आहेत. सामान्य मतदाराची या चिन्हामुळे मोठी फसगत होत असल्याने अगोदरच सर्वच मतदारसंघात झालेली बंडखोरी, वाढलेले उमेदवार आणि त्यात पुन्हा या ‘ट्रम्पेट’ चिन्हाने घातलेल्या गोळाने सोलापुरात शरद पवार गटाच्या सर्व उमेदवारांना घोर लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केलेली विनंती मान्य करून निवडणूक आयोगाने ट्रम्पेट चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द केले आहे. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचे मराठी भाषांतर तुतारी असे झाल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा संभ्रम टाळण्यासाठी ‘ट्रम्पेट’चे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द करण्याची मागणी पक्षाने केली होती. ही मागणी मान्य झाल्यामुळे पक्षाला दिलासा मिळाला खरा; परंतु विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशिवाय तुतारीसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे राहिलेल्या उमेदवारांचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

two assembly constituencies Madha and Karmala in Solapur district candidates face difficulties due to similar names
माढा, करमाळ्यात नामसाधर्म्यामुळे बलाढ्य उमेदवारांची अडचण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Vinod Tawde
Vinod Tawde : भाजपाच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत विनोद तावडेंचं मोठं विधान; म्हणाले, “ज्या नावाची चर्चा…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 _ BJP
Assembly Election: भाजपाने अखेर बंडखोरांना हिसका दाखवला; ४० नेत्यांवर उगारला कारवाईचा बडगा
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!

हेही वाचा >>>Vinod Tawde : भाजपाच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत विनोद तावडेंचं मोठं विधान; म्हणाले, “ज्या नावाची चर्चा…”

मोहोळ राखीव मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजू खरे हे उमेदवार पक्षाचे अधिकृत चिन्ह घेऊन उभे आहेत. परंतु त्यांच्या विरोधात अनिल नरसिंह आखाडे हे अपक्ष उमेदवार तुतारीसुदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे आहेत. माळशिरसमध्ये याच पक्षाचे उत्तम जानकर यांच्या विरोधात गणेश अंकुश नामदास या अपक्ष उमेदवाराने ट्रम्पेट हे तुतारीसदृश चिन्ह घेतले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा पुतण्या अनिल सुभाष सावंत हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भविष्य आजमावत आहेत. याशिवाय काँग्रेसचे भगीरथ भारत भालके यांचीही उमेदवारी कायम आहे. त्याचा फटका भालके यांना बसण्याची चिन्हे दिसत असतानाच त्यांच्याच पक्षाचे चिन्हसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन पंकज देवकते यांनी रासपकडून उमेदवारी आणली आहे.

हेही वाचा >>>Eknath Shinde : ‘लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांची पोलीस भरती’, मुख्यमंत्र्यांचे १० मोठे आश्वासनं

माढ्यामध्ये ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बडे साखरसम्राट अभिजित पाटील यांचे तगडे आव्हान आहे. परंतु त्यांच्या पक्षाच्या चिन्हाच्या सदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन राजेश तानाजी खरे हे उमेदवार उभे आहेत. त्याचा फटका पाटील यांना कितपत बसतो, याचे उत्तर निवडणूक निकालानंतरच समोर येणार आहे. शेजारच्या करमाळा मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार संजय विठ्ठलराव शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार नारायण पाटील यांचे आव्हान आहे. परंतु अन्य उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चिन्हसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे राहिलेले अशोक ज्ञानदेव वाघमोडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता दिसून येते.

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने महेश विष्णुपंत कोठे यांना संधी दिली आहे. परंतु कोठे यांना जुबेर सलीम पटेल या अपक्ष उमेदवाराच्या ट्रम्पेट चिन्हाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द करण्यात आले, तरी प्रत्यक्षात चिन्हसदृशतेमुळे मतदारांमध्ये संभ्रम संपूर्णपणे दूर होण्याची शक्यता धूसर असल्याची भीती राष्ट्रवादीच्या वर्तुळात व्यक्त होत आहे. अगोदरच सर्वच मतदारसंघात झालेली बंडखोरी, वाढलेले उमेदवार आणि त्यात पुन्हा या ‘ट्रम्पेट’ चिन्हाने सोलापुरातील शरद पवार गटाच्या सर्व उमेदवारांना घोर लागला आहे.