Sharad Pawar to Join Pune Protest: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका उशीराने घेतल्या जाणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे निवडणुका जाणीवपूर्वक लांबणीवर टाकल्या जात असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला असताना निवडणूक आयोगानं मात्र त्यासाठी चार निवडणुका एकत्र घेतल्यास व्यवस्थेवर येणारा ताण आणि महाराष्ट्रातील सण-उत्सव ही कारणं दिली आहेत. यावरून विरोधी पक्ष आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा आंदोलनांमुळे सरकारसमोर पेच निर्माण झाला आहेत. त्यातच आता पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यी दोन दिवसांपासून रस्त्यावर उतरले असून त्यांच्यासाठी आता शरद पवारांनीही मैदानात उतरण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

पुण्यात नेमकं घडतंय काय?

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आयबीपीएस परीक्षा व एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला. यासंदर्भात सरकार दरबारी वारंवार मागणी करूनदेखील त्याची पुरेशी दखल घेतली गेली नसल्यामुळे अखेर हे परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे.

Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; भाषणात म्हणाले, “दीड वर्षांनी ते…”!
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
Sharad Pawar On Dilip Walse Patil
Sharad Pawar : शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना जाहीर इशारा; म्हणाले, ‘गद्दाराला शिक्षा द्यायची, १०० टक्के…’
What Sharad Pawar Said About Devendra Fadnavis?
Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, “पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला…”
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

परीक्षार्थींनी आपली मागणी आंदोलनाच्या माध्यमातून मांडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्याशिवाय, भाजपाकडूनही काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन याबाबत भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली असून त्यामध्ये या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमका प्रकार काय?

राज्यात आयपीपीएस व एमपीएससी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी अर्थात २५ ऑगस्ट रोजी आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे परीक्षांच्या तारखा बदलाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहेत. त्याव्यतिरिक्त २०२१ व २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमधून कृषी विभागात निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. यासंदर्भातही परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी सरकार मान्य करणार? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ आश्वासन

शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम!

दरम्यान, एकीकडे सुप्रिया सुळेंनी आंदोलक परीक्षार्थींची भेट घेतल्यानंतर सरकारवर आगपाखड केली असताना दुसरीकडे शरद पवार यांनी आता राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास शरद पवार यांच्या एक्स अकाऊंटवर यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे.

“पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”, असं शरद पवार या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं २२ ऑगस्ट म्हणजेच आज यासंदर्भात बैठक पाचारण केली आहे. त्याची माहिती त्यांनी एक्स अकाऊंटवर दिली आहे. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते याकडे सर्व आंदोलक परीक्षार्थींचं लक्ष लागलं आहे.