राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकतंच शहापूरच्या दौऱ्यावर गेले होते. शहापुरमधील दौऱ्याचापाडा येथे एका भुमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. शरद पवार यांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर तेथील आदिवासी पाड्यातील एका झोपडीत जेवणाचा आस्वाद घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी झोपडीत जेवतानाचा फोटो शेअर केला असून या नेत्याला काय म्हणावे…अशी भावना व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहापूर तालुक्यातील दौऱ्याचापाडा येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कर्करोगग्रस्तांसाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व उच्च दर्जाचे शिक्षण देणारे विद्या संकुल उभारण्यात येत आहे. शरद पवार यांच्या हस्ते भुमीपूजन सोहळा पार पडला. शरद पवार यांनी यावेळी प्राथमिक शाळेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी आदिवासी पाड्यावरील एका झोपडीतच जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी सोबत जितेंद्र आव्हाड हे देखील होते. जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर जेवताना फोटो पोस्ट करताना लिहिलं आहे की, “या नेत्याला काय म्हणावे…कुडाची झोपडी…आदिवासी मावशीने केलेला स्वयंपाक…तांदळाची भाकरी… भाजलेला कोंबड्याच्या रस्सा… कनटोरल्याची भाजी…आणि साहेब जेवता आहेत…संस्मरणीय दिवस”

शरद पवारांनी जेवण केल्यानंतर कुटुंबाला चांगलं घर बांधून देणार असल्याचं आश्वासन दिलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar visit adivasi pada in shahapur sgy