राजेश्वर ठाकरे, नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या विदर्भावर लक्ष केंद्रीत केले आहे. गडचिरोलीतील पक्षाचे गतवैभव परत मिळवण्यासोबतच सध्या काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी सामाजिक उपक्रमांचा आधार घेतला जात आहे. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी या मिशनचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या यशस्वीनी सामाजिक अभियानातून महिला सक्षमीकरण आणि अपगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे दत्तक घेतले आहेत.
हेही वाचा >>> राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार निवडून येणार का? जयंत पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले…
सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून या दोन जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. यशस्वीनी सामाजिक अभियान आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) च्या माध्यमातून त्या या दोन्ही जिल्ह्यातील महिला आणि अपंग व्यक्तीसाठी विविध उपक्रम तसेच कार्यशाळा घेत आहेत. शिवाय कर्णबधिरांना कर्णयंत्र वाटप केले जात आहे.
हेही वाचा >> राज्यसभा निवडणूक : पाठिंब्यासाठी एमआयएमकडे मदत कोण मागणार? नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं
गडचिरोलीत सेनेला शह देण्याचा प्रयत्न?
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिंदे गडचिरोली जिल्ह्याला फार वेळ देत नाहीत. त्यांचे पूर्ण लक्ष ठाणे जिल्ह्यावरच असते, असा आरोप सातत्याने होत असतो. पालकमंत्र्यांविरुद्धच्या या संतापाचे राजकीय भांडवल करून येथे आपला पक्ष बळकट करण्याची संधी राष्ट्रवादीला दिसत असावी, त्यातूनच जिल्हे दत्तक घेण्याच्या कल्पनेला मूर्तरूप देण्यात आले असावे, अशी शक्यता काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.