राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना सत्तारांची जीभ घसरली. त्यांनी गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तारांच्या या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या घरावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे. तर काही कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या मुंबई येथील घरावर दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासांच्या आत मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी याबाबतचं एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. यातून त्यांनी हा इशारा दिला आहे.

हेही वाचा- “टीकेची पातळी घसरत असेल तर…” अब्दुल सत्तारांच्या अभद्र टिप्पणीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

संबंधित पत्रात तपासे म्हणाले, “विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेल्या अनेक वर्षांपासून जपला आहे. यामध्ये विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपलं आहे. असं असताना आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेलं वक्तव्य अत्यंत अशोभनीय आणि असंस्कृत आहे. याचा तीव्र निषेध करतो.”

हेही वाचा- “असे घाणेरडे लोक…”, सुप्रिया सुळेंवरील विधानाचा आदित्य ठाकरेंकडून समाचार, ‘अब्दुल गद्दार’ असा उल्लेख करत म्हणाले…

“खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रातून दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp spoke person mahesh tapase wrote letter to cm eknath shinde abdul sattar dismiss supriya sule rmm
Show comments