“शरद पवार यांना भाजपासोबत युती मान्य होती, पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते”, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तर काही दिवसांपूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, “सकाळचा शपथविधी झाला, त्याला शरद पवार यांचा आशीर्वाद होता.” मग त्या सकाळच्या शपथविधीनंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. बावनकुळे आणि फडणवीस यांचे वक्तव्य परस्परविरोधी आहे. या दोघांमधून खरं कोण बोलत आहे? हा संशोधनाचा विषय आहे. लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये, हाच शरद पवार यांचा एकमेव अजेंडा होता, हे मी यापूर्वीच सांगितले आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपुढील अडचणी वाढतील. पक्ष विस्ताराला मर्यादा येतील, याची जाणीव शरद पवार यांना होती. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शरद पवार यांना नको होते”, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनुकळे यांनी केले होते.

rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने कोणतंही ठोस…”
Devendra Fadnavis On Parbhani Band Parbhani Violance
Devendra Fadnavis : परभणीच्या घटनेत काय घडलं? आरोपी मनोरुग्ण होता का? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला मदत जाहीर
Nana Patole Criticize Devendra Fadnavis ,
“…तेव्हा गृहमंत्री फडणवीस काय करत होते?”, नाना पटोलेंचा सवाल, म्हणाले…
Raosaheb Danve On Chhagan Bhujbal
Raosaheb Danve : “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? हे फक्त अजित पवार…”, रावसाहेब दानवेंनी स्पष्ट सांगितलं

हे वाचा >> “शरद पवारांच्या नादी कोणी लागू नये, अन्यथा…”; भरत गोगावलेंच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया

बावनकुळे पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जेवढे षडयंत्र झाले आहेत. जेवढे राजकीय पक्ष तोडले गेले, हे पक्ष कुणी तोडले? आम्ही तर बहुमताने निवडून आलो. आमची युती तोडण्याचं कामही शरद पवारांनी केलं. त्यांच्या पार्टीला कधी १०० च्या वर जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांची पार्टी नेहमची ७५ च्या खाली राहिली. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी त्यांनी नेहमीच पक्षांची तोडफोड केली. शिवसेनेला आज त्यांनी उध्वस्त करून टाकलं आहे.”

हे वाचा >> ८६ वर्षांच्या भाजपाच्या माजी आमदाराला बलात्कार प्रकरणात १० वर्षांची शिक्षा; पोलिसांनी बंद केलेलं ‘हे’ प्रकरण काय होतं?

तर देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांच्यासोबत झालेल्या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता. शरद पवारांशी चर्चा करुनच तो शपथविधी झाला होता, असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली होती. अडीचवर्षांपूर्वी झालेल्या त्या शपथविधीची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. त्यावर आता रोज नवनवीन प्रतिक्रिया येत आहेत.

यावरुन राष्ट्रवादीची भाजपासोबत सत्तेसाठी जवळीक झाल्याचे भाजपाला दाखवायचे आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. यावर बोलत असताना महेश तपासे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाला कधीच जवळ केले नाही, करणाही नाही. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे. महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. असे परस्पर विरोधी वक्तव्ये करुन भाजपा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.”

Story img Loader