“शरद पवार यांना भाजपासोबत युती मान्य होती, पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते”, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तर काही दिवसांपूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, “सकाळचा शपथविधी झाला, त्याला शरद पवार यांचा आशीर्वाद होता.” मग त्या सकाळच्या शपथविधीनंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. बावनकुळे आणि फडणवीस यांचे वक्तव्य परस्परविरोधी आहे. या दोघांमधून खरं कोण बोलत आहे? हा संशोधनाचा विषय आहे. लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in