छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी तर अजित पवार यांनी २४ तासांच्या आत माफी मागावी, अशी मागणी केली आहे. भोसले यांच्या याच मागणीनंतर राष्ट्रवादीने उत्तर दिले आहे. तुषार भोसले यांना स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांतील अतंर समजत नसेल तर त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत आम्ही समजवायला येऊ, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> अजित पवारांनी संभाजीराजेंचा ‘धर्मवीर’ उल्लेख केल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’तून मांडली भूमिका, म्हणाले “अण्णाजी पंतांचे समर्थक…”

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणा धर्मवीर म्हणू नका, असे मत मांडले आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तुषार भोसले यांनी जागा व वेळ सांगावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांमधील अंतर समजवून सांगण्यात येईल. हे अंतर त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगण्यात येईल. अजित पवार यांच्याविरोधात बोलण्याअगोदर आपली पात्रता पहावी,” असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दिले आहे.

२४ तासांत माफी मागा अन्यथा….

हेही वाचा >> “जितेंद्र आव्हाडांनी आता औरंगजेबाचं मंदिर उभारावं आणि उद्घाटनाला अजित पवार…” नरेश म्हस्केंचा खोचक सल्ला

तुषार भोसले यांनी अजित पवार यांनी २४ तासांच्या आत माफी मागावी, अशी मागणी केली आहे. “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या धार्मिक परंपरांचा प्रचंड अभिमान होता. ते धर्माचे पुरस्कर्ते होते. तुमच्या पवार घराणाऱ्याचा फडतूस राजकारणाकासाठी छत्रपती संभाजी महाराजांना निधर्मी किंवा सेक्युलर करू नका. २४ तासांच्या आत माफी मागा अन्यथा उद्यापासून सगळा हिंदू समाज तुमच्याविरोधात रस्त्यावर उतरेल,” असा इशारा तुषार भोसले यांनी दिला आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

हेही वाचा >> “किरीट सोमय्या नालायक माणूस, त्याला तुम्ही…”, अरविंद सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

विधानसभेत बोलत असताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भाष्य केले होते. “महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp spokesperson suraj chavan criticizes tushar bhosale for demanding apology by ajit pawar prd