कर्जत येथे विचारमंथन शिबिर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी काळातील रणनीती आखण्याचे काम करत आहोत. एक बाब पुन्हा एकदा स्पष्ट करतो. प्रसिद्धीसाठी हापापलेली व्यक्ती स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी आमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी वक्तव्य करतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून आगामी निवडणुकांना सामोरे जाईल. निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, अशा अपेक्षासह आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> “भाजपा स्वबळावर; एकनाथ शिंदे- अजित पवार कमळावर…”, RSS च्या बैठकीवरून जितेंद्र आव्हाडांचा दावा

जितेंद्र आव्हाड काय म्हणाल होते?

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीचा संदर्भ देऊन खळबळ उडवून दिली होती. आगामी विधानसभा निवडणूक भाजपाने स्वबळावर लढवावी आणि डागाळलेल्या नेत्यांना बाजूला सारावे, असा एक मतप्रवाह संघात आणि भाजपाच्या मूळ मतदारांमध्ये असल्याचा सूर या बैठकीत निघाला. ज्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर भाजपातील अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचे खंडन केले होते. तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही आव्हाड यांच्यावर टीका करून त्यांचा दावा बिनबुडाचा असल्याचे म्हटले होते.

हे वाचा >> अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडण्याबाबत नाना पाटेकर म्हणाले, “मी एकेकाळी म्हणायचो…

कौटुंबिक सोहळ्याच्या फोटोवरून गैरसमज नको

दिवाळी, भाऊबीजच्या निमित्ताने कुटुंबाचे (पवार) सदस्य एकत्र आलो होतो. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते संभ्रमात पडतात. त्यामुळे आजच्या पक्षाच्या बैठकीत मी स्पष्ट भूमिका मांडली. राजकीय भूमिका आणि कौटुंबिक संबंध वेगवेगळे असतात. त्यांना एकमेकात जोडणे योग्य नाही. कार्यकर्ते गाफिल राहू नये, यासाठी मी स्पष्ट भूमिका मांडली.

राम मंदिर उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण नाही

राष्ट्रवादी काँग्रसेने पुरोगामित्व सोडलेले नाही. पक्षाने वेगळी राजकीय भूमिका घेतलेली असली तरी पुरोगामी विचारधारा पक्षाने सोडलेली नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे. तसेच यावेळी पत्रकारांनी विचारले की, तुम्ही राम मंदिराच्या उदघाटनासाठी अयोध्येला जाणार का? त्यावर अजित पवार म्हणाले की, मला राम मंदिर उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नाही. निमंत्रण मिळाल्यानंतर विचार करेन. पण आधीच अयोध्येत इतकी गर्दी झाली आहे की? राम मंदिराचा उदघाटन सोहळा विविध शहरात स्क्रिन दाखवावा असे आवाहन श्री राम जन्म भूमी ट्रस्टकडून करण्यात येत आहे. याचाही विचार व्हावा, असे अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp state presidant sunil tatkare slams jitendra awhad on ncp symbol kvg