मुरुड तालुक्यातील मांडला, साळाव, मिठेखार, वळके, चोरडे व तळेखार या सहा ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने साळाव, मिठेखार व तळेखार या तीन ग्रामपंचायतींवर सरपंच विराजमान होऊन तालुक्यात यश मिळवले आहे, तर शेतकरी कामगार पक्षाने चोरडे व वळके या ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखून सरपंच व उपसरपंच या पक्षाचे बसले आहेत. साळाव ग्रामपंचायत ही ग्रामविकास आघाडीने लढवली होती, परंतु सर्वानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सहभागी झाले असल्याचे तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष भरत बेलोसे यांनी माहिती दिली. साळाव ग्रामपंचायत सरपंच म्हणून अंकुश सानेकर तर उपसरपंच दिनेश बापळेकर यांची निवड झाली आहे. मिठेखार ग्रामपंचायत सरपंच- संगीता ठाकूर तर उपसरपंच- कलावती बेनारे, तळेखार येथे राष्ट्रवादी व शिवसेना यांचा मिलाप होऊन  राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच- धर्मा नामदेव पाटील तर उपसरपंच शिवसेनेचे धर्मा ठाकूर हे विराजमान झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे चोरडे ग्रामपंचायत सरपंच- गणेश टावरी, उपसरपंच अमजद मुजावर, वळके ग्रामपंचायत सरपंच- रजनी भगत तर उपसरपंच-नरेश म्हात्रे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. मांडला ग्रामपंचायतीवर शिवसेनेने बहुमत प्राप्त केले आहे. येथील सरपंचपद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव होते. परंतु येथे उमेदवार नसल्याने उपसरपंच- शैलेश रातवडकर यांच्याकडे कार्यभार राहणार आहे. उर्वरित आठ ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड ६ तारखेस होणार आहे. सर्व निवडणुका शांततेत पार पडून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा