सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार तर काँग्रेसचे एकमेव आमदार असल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, तसेच उमेदवार म्हणून आमदार दीपक केसरकर असावेत, असा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या सभेत संपर्कमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व काँग्रेसचा एकच आमदार असल्याने मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे, अशी प्रस्तावना आमदार दीपक केसरकर यांनी संपर्कमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत आ. केसरकर यांनी राष्ट्रवादीला उमेदवारी मिळण्यासाठी मांडणी केली. आमदार दीपक केसरकर यांनी प्रस्तावना जिल्हा कार्यकारिणीत मांडल्यावर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा आणि मतदारसंघाची उमेदवारी आ. दीपक केसरकर यांना देण्यात यावी, असा ठराव प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत यांनी मांडला. त्याला महिला जिल्हाध्यक्षा आनारोजीन लोबो यांनी अनुमोदन दिले.
प्रदेश सरचिटणीस माजी आमदार शिवराम दळवी यांनीही या ठरावाला पाठिंबा दिला. या वेळी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, मत्स्योद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष पुष्पसेन सावंत, कुडाळ सभापती शिल्पा घुर्ये, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, तसेच सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नगरविकास राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री उदय सामंत म्हणाले, राष्ट्रवादीचे खासदार वाढावेत म्हणून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा म्हणून पक्षाकडे मागणी करू, तसेच आमदार केसरकर यांना उमेदवारी मिळावी म्हणूनही पक्षपातळीवर प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा म्हणून एकमताने ठराव घेण्यात आला. त्याशिवाय पक्षवाढीसाठी काही निर्णयही घेण्यात आले.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा – उदय सामंत
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार तर काँग्रेसचे एकमेव आमदार असल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा,
First published on: 16-08-2013 at 03:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp to get sindhudurg ratnagiri lok sabha constituency uday samant