जयगड येथील जिंदाल कंपनीमध्ये असलेल्या कामगारांच्या वेतनामध्ये भरीव वाढ न केल्यास येत्या १३ फेब्रुवारी रोजी कंपनीचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा इशारा आमदार उदय सामंत यांनी दिला आहे.
या कंपनीत ठेकेदारी पद्धतीने सुमारे साडेचारशे कामगार असून त्यांच्या वेतनवाढीच्या मागणीबाबत आमदार सामंत यांनी कंपनीच्या प्रशासनाशी गेल्या डिसेंबरात चर्चा केली होती. त्यानंतर प्रशासनाने कामगारांच्या वेतनात अवघी ३० रुपये वाढ केली आहे. त्यामुळे कामगार संतप्त झाले आहेत.  दरम्यान कंपनीच्या आवारातील गणेश मंदिराच्या कलशारोहण समारंभासाठी अध्यक्ष सज्जन जिंदाल येत्या १३ फेब्रुवारी रोजी येणार आहेत. त्यापूर्वी प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार करून कामगारांच्या वेतनात भरीव वाढ न केल्यास या कार्यक्रमावर आपण स्वत: आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच बहिष्कार घालतील, असा इशारा आमदार सामंत यांनी दिला आहे.

Story img Loader