राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद अखेर आज दुपारी झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपा, केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. शिवाय, शिवसेना कोणत्याही दबावाला झुकणार नाही, ठाकरे सरकार राज्यात कायम राहणार असल्याचे सांगितले. तसेच, भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील संजय राऊत यांनी यावेळी काही गंभार आरोप केले. ही पत्रकार परिषद संपल्यावर यावर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेनेचा मित्र पत्र असणाऱ्या काँग्रेसकडून प्रतिक्रिया आल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी मलिक यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षच काय २५ वर्षे चालणार असल्याचंही बोलून दाखवलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा