राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्याच्या निषेधार्थ, आज साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणा देत, पोवई नाक्यापर्यंत मोर्चा काढला. शिवाय, यावेळी पडळकर यांच्या प्रतिकात्मक फ्लेक्सला जोडे मारो आंदोलन करून, त्यांच्या प्रतिमेचे दहनही केले गेले.
राष्ट्रवादी भवनासमोर जिल्हाध्यक्ष सुनील माने, दीपक पवार,युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी एकत्र आले. त्यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधाच्या घोषणा देत पोवई नाक्यापर्यंत मोर्चा काढला.
मोर्चा पोवईनाक्यावर आल्यावर तेथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक फ्लेक्सला जोडेमारो आंदोलन करून प्रतिमेचे दहन केले गेले. यावेळी पोलिसांनी पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळा कार्यकर्त्यांच्या ताब्यात काढून घेतला. त्यानंतर आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तोपर्यंत राष्ट्रवादी भवनासमोर दुसरा पुतळा तयार करून काही कार्यकर्त्यांनी त्याचे दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.
या आंदोलनात जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अतुल शिंदे, शफिक शेख, गोरखनाथ नलवडे, राजेंद्र लावंघरे, जयश्री पाटील,कविता म्हेत्रे, कुसुमताई भोसले, स्मिता देशमुख, पुजा काळे,नागेश साळुखे, पार्थ पोळके, सनी शिर्के, प्रतिक कदम, गिरिश फडतरे, वैभव मोरे, महेश जाधव, विकास अवघडे, शुभम साळुंखे, मंगेश ढाणे, प्रथमेश बाबर सागर जगदाळे, राहूल साबळे, अमर माने, स्वप्निल डोंबे, सुरेश गायकवाड, वनराज कदम, प्रकाश येवले, पांडुरंग भोसले, नलिनी जाधव, सागर जगताप आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात वाई, कोरेगाव,कराड,फलटण आदी ठिकाणीही आंदोलन करण्यात आले.वाईतील आंदोलनात युवक अध्यक्ष पंचायत समिती उपसभापती भैय्या डोंगरे,माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड,उप नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, भारत खामकर,प्रदीप चोरगे,दीपक ओसवाल,धनंजय हगीर, दिलीप पिसाळ ,मामा देशमुख आदी उपस्थित होते.