सातारा : वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी रविवारी साताऱ्यात मदन भोसले यांची भेट घेतली. जयंत पाटील आणि मदन भोसले यांच्यात सुमारे दीड तास मदन भोसले यांच्या साताऱ्यातील निवासस्थानी दारबंद चर्चा झाली. यावेळी भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष सुरभी भोसले उपस्थित होत्या. यावेळी जयंत पाटील यांनी मदन भोसले यांना विधानसभा निवडणूक आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात लढण्याची ऑफर दिल्याची माहिती मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार व किसन वीर कारखान्याचे माजी अध्यक्ष भाजपाचे ज्येष्ठ नेते मदन भोसले राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्यासाठी कार्यकर्त्यांशी सध्या चर्चा करत आहेत. या अनुषंगाने वाई येथे गुरुवारी रात्री कार्यकर्त्यांची बैठकही झाली होती. वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी व सहकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतरच मदन भोसले निर्णय घेणार आहेत.

हेही वाचा : कराड: जून, जुलैच्या अतिवृष्टीमध्ये पाच व्यक्ती, २९ पशुधनाचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा शशिकांत शिंदे यांना साडेसहा हजार मते जास्त मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा शरद पवार विचार चालण्याची शक्यता आहे. याचा अंदाज आल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूरहून पुण्याला जाताना रविवारी सकाळी मदन भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांची वाई विधानसभा मतदारसंघाचे राजकारण त्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी मदन भोसलेंना निवडणूक लढविण्याची विनंती केली आहे. मदन भोसले समोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणे अथवा अपक्ष निवडणूक लढविणे हा पर्याय आहे. या विषयावर दोघांची चर्चा झाली. जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सध्याचे इच्छुक व भाजपच्या गोटामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याविषयी कोणीही मत व्यक्त करत नाही. मदन भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी ताबडतोब विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला निवडणूक लढवायची आहे, असा आग्रह धरल्याने लवकरच मदन भोसले याबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncpsp leader jayant patil meets bjp leader madan bhosale ahead of assembly elections 2024 css