सांगली : बुडत्याला काडीचा आधार, तशाच प्रकारे वारणेच्या पुराता एकाला झाडाचा आधार गवसला म्हणून जीव वाचला. लादेवाडी (ता. शिराळा) येथील बाजीराव खामकर मिट्ट काळोखात रात्रभर महापुरात वारणेच्या पात्रातील झाडावर घटका मोजत असताना शुक्रवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकाने त्याची सुखरुप सुटका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिराळा तालुक्यातील लादेवाडी येथील बाजीराव खामकर गुरुवार दि २७ रोजी रात्री उशिरा काखे मांगले पुलावरून वारणेच्या नदीपात्रात पडला होता. नदीतील पाण्याचा प्रवाह जलदगतीने असल्याने खामकर हा पाण्यातून वाहून गेला. बुडत्याला काठीचा आधार या म्हणीप्रमाणे त्याला एका झाडाचा आधार मिळाला. मदतीसाठी आरडाओरडा करूनही रात्र असल्याने महापुराच्या पाण्यामुळे आवाजही काठावर पोहचत नव्हता. रात्रीची वेळ असल्याने माणसांची वर्दळही नव्हती. रात्रभर तो नदीच्या मधोमध असणाऱ्या झाडावर जाऊन बसला.

हेही वाचा – अकोला : शेतात आढळला ११ फूट लांब अजगर अन् घरात सापडले सात साप

हेही वाचा – आरोग्य उपसंचालक पदाच्या परीक्षेत खुल्या वर्गावर अन्याय; किमान पात्रता गुणात अनियमितता झाल्याची…

आज सकाळी परिसरातील शेतकरी शेतात जात असताना त्याने पुराच्या पाण्यात अडकल्याचे ओरडून सांगितले. ही बातमी गावात पसरताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांची नदी काठावर गर्दी झाली. एनडीआरएफच्या बचाव पथकाने येऊन त्याची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली. माऔगले आरोग्य केंद्रात त्याची तपासणी करण्यात आली असून प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खामकरसाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती. घटनास्थळी शिराळा तहसीलदार शामला खोत, शिराळा ठाण्याचे पोलीस, तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ndrf team rescued a person trapped in flood in sangli ssb