बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे यांचे मत
सलीम अली पक्षीगणना हा उपक्रम सर्वसामान्य व्यक्तींना राजदूत म्हणून तयार करण्यासाठी असल्याचे मत बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी व्यक्त केले.
‘बर्ड काऊंट इंडिया’च्या सहकार्याने भारतातील २२ राज्यांत १५ नोव्हेंबर रोजी आयोजित पक्षीगणनेदरम्यान या नोंदी करण्यात आल्या.
त्यानिमित्ताने बोलताना आपटे म्हणाले की, रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक सामान्य मनुष्याला पक्षीजगताशी जोडण्याची गरज आहे. त्यांना केवळ पक्षीनिरीक्षणात सहभागी करून घेणे हाच एकमेव उद्देश नाही, तर त्यांना पक्षीनिरीक्षणातील राजदूत बनवणे हाही हेतू आहे.
पक्षीनिरीक्षणादरम्यान एका तासात ८०५ व्यक्तींनी योगदान दिले. पक्षीनिरीक्षणासाठी सकाळची वेळ अतिशय चांगली समजली जाते आणि सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान २८४ लोकांनी यात सहभाग घेतला. यातीलच १०४ व्यक्तींनी दुपापर्यंत त्यांचा सहभाग कायम राखला आणि ७३ व्यक्ती अखेपर्यंत पक्षीनिरीक्षणात कायम होत्या.
राज्यनिहाय गणना
भारतातील २२ राज्यांमधील ९९ जिल्ह्य़ांत हा उपक्रम राबवण्यात आला. यात महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे एकूण १२३ याद्या प्राप्त झाल्या. केरळ राज्यातून ५९ याद्या तर कर्नाटक व तामिळनाडूमधून ४० याद्या प्राप्त झाल्या. उत्तर भारतातील दिल्ली सहा, हरयाणा तीन, उत्तर प्रदेश सात आणि उत्तराखंडमध्ये २४ याद्या प्राप्त झाल्या. उत्तर पूर्व आणि पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेशात दोन, आसाममध्ये सात, मिझोराममध्ये तीन, ओदिशात पाच, पश्चिम बंगालमध्ये नऊ याद्या प्राप्त झाल्या. मध्य आणि पश्चिम भारतातील छत्तीसगडमध्ये १३, गुजरातमध्ये सात, झारखंडमध्ये एक, मध्य प्रदेशमध्ये चार, महाराष्ट्र १२३ आणि राजस्थानमधून एक यादी प्राप्त झाली. दक्षिण आणि किनारपट्टीच्या भागातील आंध्र पदेशात नऊ, गोवा १२, कर्नाटक ४०, केरळ ५९, तामिळनाडू ४०, तेलंगणा ४ आणि अंदमान व निकोबारमधून चार याद्या प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा