उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. हा आज एक ऐतिहासिक आहे. कारण त्यांच्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवसेना-भाजपा युती किती मजबूत आहे आणि किती मनापासून झाली आहे ते आजच्या प्रवेशामुळे स्पष्ट झालं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार, युतीचं सरकार आपण आणलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन, अटलजी सगळ्यांना अभिप्रेत असलेली युती आपण केली आहे. केंद्रात भाजपाची सरकार आहे. त्याच धर्तीवर युती सरकार स्थापन व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा होती असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे पण वाचा Neelam Gorhe: सुषमा अंधारेंमुळे नाराजी होती का? नीलम गोऱ्हेंची शिंदे गटातील प्रवेशावेळी खोचक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “सटर-फटर…!”

वर्षभरापूर्वी आमचं सरकार आल्यानंतर आम्ही राज्यात धडाकेबाज निर्णय घेतले. राज्यात युतीचं सरकार स्थापन व्हावं ही लोकांची इच्छा होती. आम्ही जे काम करतो आहे ते लोकांना पसंत पडतं आहे. संपूर्ण राज्यात आमच्या निर्णयांची चर्चा आहे. ज्यांना टीका करायची आहे त्यांना करुद्या आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

२०१४ ते २०१९ हे युतीचं सरकार होतं आणि देवेंद्र फडणवीस हे तेव्हा मुख्यमंत्री होते. मी त्या मंत्रिमंडळात होतो, त्याही वेळी लोकहिताचे निर्णय घेतले. पण दुर्दैवाने मधल्या काळात वेगळं सरकार होतं. त्या काळात प्रकल्प मंदावले होते, विकासकामांना खिळ बसली होती. पण आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर लोकहिताचे जे निर्णय आहेत ते आम्ही घेतले आहे. बंद पडलेल्या प्रकल्पांनाही आम्ही चालना दिली असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष आम्हाला दिला आहे.

हे पण वाचा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

सर्वोच्च न्यायालयानेही काय निकाल दिला ते आपण पाहिलं. त्याचे काही लोक वेगळे अर्थ काढत आहेत ते काढू देत पण असं असताना पदाधिकारी, आमदार, खासदार आमच्या बरोबर येत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आमच्याकडे येत आहेत. मनिषाताईही आपल्याकडे आल्या. घटनात्मक उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे यादेखील आपल्या बरोबर आल्या. त्यांनी महिलांच्या उत्कर्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी जो असतो त्याला लोकहिताचं काम करण्याची इच्छा असते त्याच भावनेतून नीलम गोऱ्हे आमच्या बरोबर आल्या आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neelam gorhe entry into the party is historic said eknath shinde also told the reason scj