Nepal Bus Accident : नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने २४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १६ पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये काहीजण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात नर्स्यांगडी अंबुखैरनीजवळ घडला. भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळल्याची घटना घडली.

नेपाळमध्ये झालेल्या या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. तसेच या घटनेतील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने उद्या (२४ ऑगस्ट) २४ जणांचे मृतदेह नाशिकमध्ये आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.

mumbai best bus accident
Best Bus Accident: कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसएमटी परिसरात बसखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
2160 BEST buses scrapped in five years Mumbai print news
पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात, केवळ ३७ नव्या बसची खरेदी
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Best Bus accident, Inquiry committee BEST,
Best Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तातडीची मदत, बेस्ट उपक्रमाकडून चौकशी समिती स्थापन
Best Bus Accident
Best Bus Accident : “सुरुवातीला बेस्ट बसने तीन रिक्षा आणि काही लोकांना उडवलं आणि…”; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक

हेही वाचा : नेपाळ बस अपघातातील मृतांमध्ये जळगावच्या काही भाविकांचा समावेश

जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू. त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.

Story img Loader