लोकसत्ता वार्ताहर

परभणी: अलीकडे शेतात सौरऊर्जेसाठीचे पॅनल लावल्यानंतर ती जमीन वहीतीत आणता येत नाही या समजाला छेद देणारे संशोधन केले जात आहे. सौरऊर्जेच्या पॅनलखालील जागेत नवनवीन पिके घेतली जाऊ शकतात. याद्वारे सौरऊर्जा निर्मितीबरोबरच विविध पिकांची लागवड शक्य असल्याचे नव्या तंत्रज्ञानातून साधले जाणार आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

ॲग्रोपीव्ही तंत्रज्ञानाच्या विकास व संशोधनासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, जर्मन एजन्सी जीआयझेड आणि सनसीड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात गेल्या आठवड्यात (२४ जून) नवी दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी सभागृहात सामंजस्य करार झाला. यावेळी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि जीआयझेडच्या इंडो-जर्मन एनर्जी फोरमचे संचालक टोपियास विंटर, सनसीड एपीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक सराफ, जीपी पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पी. एल. गौतम आणि वायव्हीके राहुल हे उपस्थित होते.

हेही वाचा… पावसाळ्यात चिमुकल्यांनी घरीच घेतला आजीच्या हातच्या पाणीपुरीचा आस्वाद; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

ॲग्रीपीव्ही तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, ॲग्रीपीव्ही – ॲग्रीफोटोव्होल्टेइक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतात सौरऊर्जेतून वीजनिर्मिती आणि विविध पिकांची लागवड दोन्ही कार्य करणे शक्य होते. सौरऊर्जा निर्मितीचे जे पॅनल असतात ते शेतात उभे करून त्याखालील जागेत विविध पिकांची लागवड केली जाते. हे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक असून कोणतेही प्रदूषण होत नाही. या तंत्रज्ञानाचा जर्मनी, जपान व इटली देशामध्ये वापर होत असून भारतातही या तंत्रज्ञानास वाव आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा… जबरी चोरी खटल्यात ‘मोक्का’तील दोघांना आठ वर्षे सक्तमजुरी, दहा लाखांचा दंड

सौरऊर्जाच्या पॅनलसाठी मोठ्या प्रमाणात जमीन क्षेत्रफळाची आवश्यकता लागते, त्यामुळे ॲग्रीपीव्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सौरऊर्जेतून वीजनिर्मितीसोबत विविध पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्न मिळण्याचे साधन प्राप्त होऊ शकते. हे तंत्रज्ञान भारतासाठी नवीन असून या तंत्रज्ञानाची मराठवाड्यातील पीक पद्धतीत कितपत उपयुक्त ठरू शकते, याकरिता संशोधनाची गरज आहे.

हेही वाचा… “दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्रातील ४० खोके…”, मोदी-शाहांचं नाव घेत संजय राऊतांचा हल्लाबोल!

परभणी कृषी विद्यापीठाने जीआयझेड सामजंस्य करार केला आहे. जीआयझेड हा जर्मन फेडरल सरकारच्या मालकीचा आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे, जो १३० हून अधिक देशांमध्ये अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. या करारांतर्गत संशोधन प्रकल्पाचा उद्देश विविध ॲग्रीव्होल्टेइक संरचना अंतर्गत योग्य पीक लागवडीची धोरणे तयार करणे हा आहे. याद्वारे भारतातील हवामानात विशेषतः मराठवाडा विभागात ॲग्रीपीव्ही तंत्रज्ञानास अनुकूल पीक पद्धती तयार करणे हे भविष्यातील आव्हान असून विद्यापीठाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही संशोधनास मदत होणार आहे. यासोबतच कराराच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, काटेकोर शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि इतर तत्सम क्षेत्रात जीआयझेडसोबत सहकार्याने संशोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘वनामकृवि’च्यावतीने देण्यात आली.