सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका ट्रक मधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथे आणला आहे.

मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर छत्रपतींच्या राजकोट किल्ल्यावर काल बुधवारी भाजप आणि ठाकरे शिवसेना यांच्यात जोरदार राजकीय राडा झाल्याची घटना ताजी असतानाच काल बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मालवणात छत्रपती संभाजी नगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेचे कार्यकर्ते एका ट्रक मधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घेऊन मालवणात दाखल झाले. हा पुतळा राजकोट येथील शिवपुतळा कोसळलेल्या चौथर्‍यावर बसविण्यासाठी आपण आलो आहोत, असे या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र, मालवण पोलिसांनी याबाबत त्वरित हस्तक्षेप करत कोणत्याही परवानगीशिवाय हा पुतळा बसवता येणार नाही, असे सांगून त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

आणखी वाचा-Chetan Patil : शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण; गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याने दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी फक्त…”

मालवण मधील राजकोट किल्ल्यावर काल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या पाहणीसाठी राजकोट किल्ल्यावर आलेल्या भाजप व ठाकरे शिवसेनेच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याने मालवणातील वातावरण तंग बनले होते. या राड्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका ट्रक मधून छत्रपती शिवाजी महाराजांचा २० फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा मालवणात दाखल झाला. याबाबत माहिती मिळताच सदर ट्रक मालवण वायरी रस्त्यावर असताना मालवण पोलिसांनी हा ट्रक थांबवून ठेवत चौकशी केली.

आणखी वाचा-Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: “आम्ही फक्त सहा फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली होती, पण…”, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रांचे मोठे विधान

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी नगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थेमार्फत हा पुतळा मालवणात आणण्यात आला होता. राजकोट येथील किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याने तेथील चौथऱ्याचे रूप हे विद्रूप दिसत असून नवीन पुतळा उभारेपर्यंत या चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असावी, या उद्देशाने आम्ही राजकोट येथे पुतळा बसविण्यासाठी आम्ही आलो आहोत, यासाठी प्रशासनाची भेट घेऊन परवानगी मागणार आहोत अशी माहिती यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी दिली.

यावेळी सदर ट्रक मालवण पोलीस स्थानकाच्या आवारात नेऊन या संस्थेच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात येत असून बयाबाबत पुढे काय घडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Story img Loader