सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्याने पूरभाग रचना प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. एकूण ३८ प्रभागांचा हा प्रारूप आराखडा कोणत्या राजकीय पक्षाला अनुकूल आणि कोणत्या पक्षाला प्रतिकूल यावर दावे-प्रतिदावे होत आहेत. तथापि, हा प्रारूप आराखडा एकाच्या चेहऱ्यावर हसू पेरणारा तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आसू आणणारा असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९६४ सालापासून अस्तित्वात असलेल्या आणि एके काळी राज्यात चौथ्या स्थानावर राहिलेल्या सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या १०२ वरून ११३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यात एकूण ३८ प्रभागांची रचना करण्यात आली आहे. एकूण प्रभागांपैकी ३७ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन नगरसेवक आणि एका प्रभागात दोन नगरसेवक राहणार आहेत. लोकसंख्येच्या अनुषंगाने विचार करताना नवीन प्रभाग रचना आराखडा किमान २२ हजार ७६५ ते कमाल २७ हजार ७०० इतक्या लोकसंख्येचा समावेश राहणार आहे.

नवीन प्रभाग रचना प्रारूप आराखडा दुपारी महापालिका कौन्सिल हॉलमध्ये जाहीर होताच त्याचे अवलोकन करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या आजी-माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. आराखडय़ाचे चांगले-वाईट प्रतिबिंब त्या त्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होते. दरम्यान, नवीन प्रभाग रचना प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमानुसार तयार करण्यात आल्याचे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले. या प्रारूप आराखडय़ाच्या संदर्भात १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात येत आहेत.