मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून राजकीय नेत्यांकडून वेगवेगळी विधानं केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ असतील, अशा आशयाचे काही बॅनर महाराष्ट्रात विविध ठिकाणी लागले आहेत. त्यामुळे अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असं विधान जयंत पाटलांनी केलं. जयंत पाटलांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत धुसपूस असल्याचं पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Radhakrishna Vikhe Patil Said This Thing About Rahul Gandhi
Radhakrishna Vikhe Patil : “राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जायचा प्रस्ताव..” राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Ramdas Athawale, Panvel Candidate Prashant Thakur,
राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

“पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल” या जयंत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “त्यासाठी आपण आधी एकत्र बसू… मग सत्ता येईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल. या बैठकीनंतर नक्कीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, याबाबत काहीही दुमत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणं, हाही महाविकास आघाडीचाच निर्णय होता. अशाप्रकारचे निर्णय भविष्यात घेतले जातील.

“पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल”, या जयंत पाटलांच्या दाव्याबाबत विचारलं असता राऊत पुढे म्हणाले, “भाषणात आपण तसं बोलत असतो. त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलतील… काँग्रेसच्या मेळाव्यात नाना पटोले बोलतील आणि आमच्या मेळाव्यात आम्ही बोलू… पण महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही एकत्र बसतो, तेव्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, अशी आमची भाषा असते.”

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

जयंत पाटील म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचं आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे. हे आता जवळपास सर्वांनी मान्य केलं आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. म्हणून मला खात्री आहे की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल.