राज्यात महाविकास सरकारने सत्तेत अडीच वर्षे पूर्ण केली आहेत. करोना संसर्ग, मंत्र्यांचे राजीनामे, नेत्यांवर झालेले वेगवेगळे आरोप आणि केंद्रीय तपास संस्थांकडून सुरु असलेली नेत्यांची चौकशी अशा संकटांना तोंड देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार आपला कारभार हाकत आहे. असे असताना आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रिपदावर मोठे भाष्य केले आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात’, आमदार रवी राणा यांचं मोठं विधान

“आज आपल्याला सांगतो. पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. पाच वर्षे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या प्रश्नवारती कितीही मजबूत कितीही वजनदार सरकार असलं तरी त्याला गदागदा हलवायचं काम मी विरोधी पक्षनेता म्हणून केलं. सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाचा मंत्री म्हणून आज शब्द देतो की, येणाऱ्या काळात साामजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रिपद द्यायचं कोणाला हा प्रश्न पुढ्यात आला; तर जे कोणी मुख्यमंत्री असतील.. आपलेच असतील… ते म्हणतील हा विभाग आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाला नको. एवढी प्रतिष्ठा प्राप्त करुन द्यायचं काम येणाऱ्या काळात करुन दाखवीन हे वचन मी आज तुम्हाला देतो,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये एक हजार रुपयांमुळे वाद, गॅरेज मेकॅनिकवर जीवघेणा हल्ला; मुख्य आरोपीस अटक, दोघे फरार

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असे म्हटले असेल तर त्यात काही गैर नाही. प्रत्येक पक्षाने तशी अपेक्षा ठेवली पाहिजे. लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र काहींना दिवसाही स्वप्न पडतात, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा >>> ‘पेट्रोल, डिझेल संपणार, आता..,’ पर्यायी इंधनावर नितीन गडकरी यांचे मोठे विधान

तर वास्तव ते जगुया सध्या. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. महाविकास आघाडी सरकारचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं वाटतं यात गैर काय. आपलं महाविकास आघाडी सरकार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मागे न लगता सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Next cm of maharashtra will be formed ncp party said dhananjay munde prd
Show comments