गेली तीन वर्षापासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आणि लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना गुरूवारी ( १६ नोव्हेंबर ) देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिला. आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसून महाराष्ट्रातील राजकारणातच राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या राज्यांतील प्रचारात फडणवीस सहभागी होत असल्याने ते राष्ट्रीय राजकारणात जबाबदारी पार पाडू लागल्याची चर्चा रंगली होती. फडणवीस आगामी काळात दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होतील आणि उत्तर मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढतील, असेही बोलले जाऊ लागले होते. मात्र, गुरूवारी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी ही शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
Devendra Fadnavis At Loksatta Varshavedh
Loksatta Varshavedh : ‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?

हेही वाचा : पहिली बाजू : फडणवीसच मराठय़ांचे तारणहार!

“पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन”

“राजकारणात १० दिवसांनी काय होईल, हे माहिती नसते. पण, पुढील १० वर्षांनंतरही मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असेन आणि पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन,” असे फडणवीसांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

“लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय कटुता कमी होईल”

“राज्यातील राजकारणात खूपच कटुता आली आहे. निवडणुकांच्या काळात ती वाढतच जाते. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर ती कमी होईल,” अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली.

“‘वर्षा’ शेवटी सागरालाच मिळते”

पुढील दिवाळी ‘सागर’ की ‘वर्षा’ बंगल्यावर साजरी करणार? यावरही फडणवीसांनी भाष्य केलं आहे. “मी पुढील दिवाळी ‘सागर’ बंगल्यावरच साजरी करणार आहे. ‘वर्षा’ शेवटी सागरालाच मिळते,” अशी टीप्पणी फडणवीसांनी केली आहे.

हेही वाचा : मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून फडणवीसांना केलं जातंय लक्ष्य? राज्याच्या राजकारणात काय घडतंय?

“निवडणुका भाजपामुळे थांबलेल्या नाहीत”

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपा कधीही तयार आहे. यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका स्थगित आहेत. त्या भाजपामुळे थांबलेल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जो निकाल लागला आहे, तोच या निवडणुकांमध्ये लागेल व भाजपाला घवघवीत यश मिळेल,” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

Story img Loader