आयसीस ( ISIS ) या जिहादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी परभणीतील २९ वर्षीय तरुणाला एनआयएच्या विषेश न्यायालयाने ७ वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. नासेरबिन अबुबकर याफईस असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

जिहादी कारवायांचे समर्थन केल्याचे तपासात उघड
२०१६ साली ISIS संघटनेशी संबंध असल्या प्रकरणी नासेरबिनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर खटलाही चालवण्यात येत होता. नासेर बिनने ISIS चा कमांडर फारुख याच्याकडून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच तो इस्लामिक स्टेटच्या सदस्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या जिहादी कारवायांचे समर्थन करण्यासाठी ऑनलाईन संसाधने वापरत असल्याचे तपासात समोर आले होते.

आणखी तीन जणांना अटक
महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने परभणी-आधारित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. खान, इक्बाल अहमद आणि मोहम्मद रईसुद्दीन या तिघांनाही अटक करण्यात आली. इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) पूर्वीचा सदस्य असलेला फारूक उर्फ ​​शफी अरमार अद्याप फरार आहे.

Story img Loader