Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने एफआयआर दाखल केला आहे. उमेश यांची हत्या एका विशिष्ट समुदायामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आल्याचे एनआयएनने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय संबंध?

उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला होता. त्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेने या घटनेचा तपास करत एफआयआर दाखल केला आहे. उमेश यांची हत्या करण्यामागे देशातील एका विशिष्ट समुयादायातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे हा एक उद्देश होता. असं एफआयआरमध्ये म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता असल्याचेही एआयएने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी वादग्रस्त ठरलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली होती. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍ कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० वाजताच्या सुमारास श्याम चौकातील घंटाघर परिसरात चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा – धार्मिक रंग देऊन समाजात तेढ निर्माण करू नये! ; हत्या झालेले उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा; सामाजिक सलोख्याचा आग्रह

Story img Loader