शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गट आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी काही दिसवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा ठाकरे कुटुंबातील एका सदस्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई निहार ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
कोण आहे निहार ठाकरे?
निहार ठाकरे हे बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते आपली राजकीय कारकीर्द सुरु करणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा – “रझा अकादमी, पीएफआय या संघटनांवर बंदी घालावी”; खासदार अनिल बोंडेंची मागणी
स्मिता ठाकरेंनी घेतली होती शिंदेंची भेट
काही दिवसांपूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर स्मिता ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना, आपण मुख्यमंत्री शिंदे यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आली असल्याचे त्यांनी सांगितेले होते. तसेच शिवसेनेला पुढे नेण्यात सीएम शिंदे यांचे मोठे योगदान असल्याचेही त्या म्हणाल्या.