मुंबई : तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणीनंतर प्रतिष्ठेच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर परब फिटनेसच्या नीलेश दगडेने आपले नाव कोरले. या स्पर्धेत नीलेशने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. त्याने ७० आणि ८५ किलो वजनगटातील विजेते अनुक्रमे उमेश गुप्ता आणि अनिकेत पाटील यांना आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. त्याचा विजय अगदीच एकतर्फी झाला.

नीलेशकडून पराभूत झालेल्या उमेश गुप्ता (यू.जी. फिटनेस) आणि अनिकेत पाटील (सावरकर जिम) यांना पुढील काळात हा किताब जिंकण्यासाठी केवढी तयारी करावी लागेल याचे जणू पाठच शिकावयास मिळाले. उमेश त्याच्या ७० किलो गटामध्ये निर्विवाद विजेता होता, तीच गोष्ट ८५ किलो गटात अनिकेत पाटीलची होती. अनिकेतचे प्रमाणबद्ध शरीर त्याला अव्वल स्थान देऊन गेले.

ICC Champions Trophy History and Records in Marathi
Champions Trophy History: आधी २ मग ४ आणि आता तब्बल ८ वर्षांनी होतेय चॅम्पियन्स ट्रॉफी! विस्कळीत स्पर्धेची गोष्ट ठाऊक आहे का?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
R R Borade death news in marathi
प्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन
Pak pm Shehbaz Sharif on champions trophy
जेतेपद मिळविण्याइतकेच भारताला हरविणे महत्त्वाचे!पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचे वक्तव्य
supreme court justice bhushan gavai in anandwan
अनेक संस्थांची संस्थानिके, मात्र आनंदवनात सेवाभाव!न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; आनंदवन मित्रमेळाव्याचे उद्घाटन
pune Dasnavami celebrations loksatta news
आनंदाश्रमातील दासनवमी उत्सवाची शंभरीकडे वाटचाल
caste validity certificate submission on April 6 2025
६ एप्रिलपर्यंत जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा ; ‘एसईबीसी’ आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम संधी
award wapsee marathi news
Award Wapsee: ‘पुरस्कार परत देणार नाही असं आधीच लिहून घ्या’, संसदीय समितीची शिफारस, निषेध म्हणून पुरस्कार वापसीवर आक्षेप!

महिलांमध्ये हर्षदा सरस

अलीकडच्या काळात महिला व्यायामाकडे वळू लागल्याने त्यांच्यासाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा महिला वर्गाला प्रेरणादायी ठरू लागल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये महिलांचे वाढते प्रमाण आणि प्रत्यक्ष सहभाग लक्षणीय ठरत आहे. महिलांच्या शरीरसौष्ठवामध्ये हर्षदा पवार (हक्र्युलस फिटनेस) हिने आपले वर्चस्व राखताना आपल्याच जिममधील किमया बेर्डेला मागे टाकले. तर, महिलांच्या फिजिक स्पोर्ट्समध्ये रेणुका जनौतीने बाजी मारली.

अलंकार, अनिकेतला यश

पुरुषांच्या ‘फिजिक’ स्पर्धेमध्ये चुरस पाहावयास मिळाली. १७० सेंटिमीटर आणि १७० सेंटिमीटरवरील गटामध्ये अनिकेत सावंत (बॉडी वर्कशॉप) आणि अलंकार पिंगळे (दांडेश्वर व्यायामशाळा) यांनी कडव्या लढतीअंती विजेतेपद जिंकली. आकाश जाधव आणि मिनेश ठक्कर (मांसाहेब जिम) उपविजेते ठरले.

Story img Loader