लोकसभा निवडणुकीच्या निकालाला महिना उलटून गेला आहे. मात्र या निकालाचे पडसाद अजूनही राजकारणात उमटताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांचे विश्वासू अशी ओळख असलेले निलेश लंके यांनी शरद पवारांच्या पक्षात जाणं पसंत केलं. तसंच त्यांनी अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना टक्कर दिली आणि ही जागा ते जिंकले. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लोकसभेच्या सामन्यात महाविकास आघाडीने बाजी मारली. कारण ४८ पैकी ३० जागा मविआच्या आल्या आहेत. एक अपक्ष जागा तर १७ जागी महायुतीला यश मिळालं.

अजित पवार निलेश लंकेंबाबत काय म्हणाले?

या सगळ्या चर्चा सुरु असतानाच आता निलेश लंकेंनी काय अट ठेवून माझ्याकडून लोकसभा निवडणूक लढवायची तयारी ठेवली होती ते आता अजित पवारांनी सांगितलं आहे. निलेश लंकेंनी ती अट ठेवली, त्यानंतर मी लंकेंच्या उमेदवारीबाबत भाजपा नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र विद्यमान खासदार असल्याने भाजपाने ती जागा सोडली नाही. असं अजित पवार म्हणाले.

pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Bachchu Kadu On Uddhav Thackeray Sharad Pawar
Bachchu Kadu : ‘उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष लवकरच…’, बड्या नेत्याचा दावा; म्हणाले, “राजकीय उलथापालथ…”
Imtiaz Jaleel On Beed Guardian Minister
Imtiaz Jaleel : “अजित पवार फक्त कागदावर बीडचे पालकमंत्री असतील, अन् दुसरंच कोणी…”, इम्तियाज जलील यांचा आरोप
nilesh lanke
निलेश लंकेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट (PC : Nilesh Lanke/FB)

निलेश लंकेंनी सुजय विखेचंचा ३५ हजार मतांनी केला पराभव

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुजय विखे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके यांच्यामध्ये लढत झाली. या निवडणुकीत निलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मतं मिळाली, तर सुज विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मतं मिळाली. लोकसभेच्या मैदानात निलेश लंकेंनी सुजय विखेंचा साधारण ३५ हजार मतांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंनी निलेश लंकेंना इंग्रजी येत नाही, या मुद्द्यावर खिल्ली उडवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीमध्ये शपथ घेतली. ज्याचीही चर्चा झाली होती. आता या सगळ्या गोष्टी घडल्या असताना अजित पवारांनी सिक्रेट बाब उघड केली आहे.

हे पण वाचा- “I, Nilesh Dnyandev Lanke…”; भाषेवरून हिणवलेल्या लंकेंची इंग्रजीतून शपथ, त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर…

अजित पवार निलेश लंकेंबाबत काय म्हणाले?

निलेश लंके माझ्याकडून लोकसभा निवडणूक लढवायला तयार होते. मला लोकसभा द्या आणि माझ्या पत्नीला विधानसभा द्या अशी अट निलेश लंकेंनी ठेवली होती. मी भाजपाच्या लोकांशी बोललो पण त्यांनी ही आम्हाला सांगितलं या ठिकाणी सुजय विखे पाटील विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी ही जागा सोडली नाही. ही जागा धोक्यात आहे असं आपण भाजपाच्या नेत्यांना सांगितलं होतं. असंही अजित पवार म्हणाले.

Story img Loader