राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभेसाठी निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निलेश लंके यांनी २९ मार्चला आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर आज शरद पवार यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. पारनेरच्या मेळाव्यात शुक्रवारी लंके यांनी राजीनामा दाखवला. त्यानंतर शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं. आज शरद पवार यांनी त्यांचं नाव जाहीर केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा उमेदवार कोण कोण?
वर्धा – अमर काळे
दिंडोरी – भास्करराव भगरे
बारामती – सुप्रिया सुळे
शिरूर – अमोल कोल्हे</p>
अहमदनगर – निलेश लंके
निलेश लंकेंनी मालने शरद पवारांचे आभार
मी शरद पवार यांचे आभार मानतो, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना धन्यवाद देतो. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझं नाव जाहीर केलं आहे. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनाही धन्यवाद देतो. कुणाच्याही विश्वासा तडा जाऊ देणार नाही. असं निलेश लंकेंनी म्हटलं आहे. नगरमध्ये पाण्या प्रश्न गंभीर आहे. शेतमालाला भाव नाही. दुधाच्या बाबतीत दर वाढत चालले आहेत. मला संधी मिळाली तर मी जनतेची सगळी कामं करण्याचा, त्यांच्या विकासाला प्राधान्य देणार आहे असंही निलेश लंकेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- निलेश लंकेंनी लोकसभेसाठी अखेर राजीनामा दिला; भावूक होत म्हणाले, “पवार साहेबांना त्रास दिला…”
आणखी काय म्हटलं आहे निलेश लंकेंनी?
“परिस्थितीनुसार काय काय मार्ग निघतो ते बघेन. आज लढाई सुरु झाली आहे. महाविकास आघाडीतले तीनही घटक पक्ष म्हणजेच शरद पवार, बाळासाहेब थोरात , उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी झाली आहे. ही आघाडी अभेद्य आहे. महाविकास आघाडीतले घटक पक्षही आपल्याच पक्षाचा उमेदवार आहे या अनुषंगाने प्रचार करतील” असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.