अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके लोकसभेच्या मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. ‘निलेश लंके यांनी पाठांतर करुन माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलावे, आपण उमेदवारी मागे घेऊ, असे आव्हान सुजय विखे पाटील यांनी दिले होते. त्यानंतर आता निलेश लंके यांनी सुजय विखे यांना टोला लगावला आहे. ‘विखे फक्त बोलतात, पण मी जे बोलतो तेच करतो’ , असे निलेश लंके म्हणाले आहेत.

निलेश लंके काय म्हणाले?

“स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सर्व तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. वाड्या-वस्तीवरदेखील या जनसंवाद यात्रेचे जोरदार स्वागत होत आहे. मी निवडणुकीला सामोरे जात असताना त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करत असतो. कोणत्या परिसरात काय अडचण आहे. हा लोकसभेचा मतदारसंघ ७५ टक्के दुष्काळी पट्टा आहे. या भागात बेरोजगारी, दुध व्यवसायाच्या प्रश्नासह अनेक प्रश्न आहेत. मी जर निवडून आलो तर पारनेर, कर्जत-जामखेड आणि श्रीगोंद्याला पॅनलचे पाणी कधी कमी पडू देणार नाही”, असे निलेश लंके म्हणाले.

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
What Jitendra Awhad Said?
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा टोला, “…तर धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ashish Shelar on Raj Thackeray
Ashish Shelar: “मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो की…”, राज ठाकरेंनी निकालावर संशय घेताच भाजपाचा पलटवार
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”

हेही वाचा : “मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा

निलेश लंके म्हणाले, “सुजय विखे फक्त बोलतात, पण मी जे बोलतो तेच करतो. आमदारकीच्या कार्यकाळात पारनेर मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली. त्यामुळे आगामी काळातदेखील येथील प्रश्न सोडविण्याचे काम केले जाईल. साकळाई योजनेचाही पाठपुरावा केला होता. परंतु मधल्या काळात सत्तांतर झाल्याने कामे ठप्प झाले होते. आता हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याचे काम केले जाईल”, असे आश्वासन निलेश लंके यांनी दिले.

दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली.

Story img Loader