शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत करीश्मा करुन दाखवला आहे यात शंकाच नाही. महाराष्ट्रात दहा जणांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी आठ खासदार निवडून आले आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह या चिन्हासह लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या शरद पवारांचं हे यश चांगलंच चर्चेत आहे. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. या मेळाव्यात अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी जोरदार भाषण केलं आणि शरद पवारांचा नाद करु नका असंही अजित पवारांना सुनावलं आहे. तसंच शरद पवारांनीही निलेश लंकेंबाबत भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले शरद पवार?

“खरं सांगायचं तर निलेश लोकसभेत चालल्यावर मला एका गोष्टीची काळजी आहे, आमचे जे जे जुने सभासद संसदेत आहेत ते मला नक्की विचारतील, हा कोण गडी आणला? मी आज तुम्हाला (निलेश लंके) सांगतोय तिथे शुद्ध मराठीतही भाषण करता येतं. तुम्ही मातृभाषेत बोलू शकता. एकदा माईक हातात आला की निलेश लंके मराठीत काय बोलतील याचा भरवसा नाही.” निलेश लंके यांनी केलेलं भाषणही चांगलंच चर्चेत आहे.

“हा भटकता आत्मा तुम्हाला…”, शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना सुनावले खडे बोल

काय म्हणाले निलेश लंके?

“राष्ट्रवादी पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. आपलं दैवत म्हणजे शरद पवार आहेत. अरे मित्रांनो हा तर ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है तो म्हणजे विधानसभा निवडणूक. आदरणीय शरद पवारांनी असा चेंडू टाकला की समोरच्यांचा त्रिफळाच उडाला. नाद करा पण शरद पवारांचा नाही बाळांनो. भलेभले थकले हे विसरु नका. आता मुंबईवर झेंडा तो पण बहुमतानेच. विधानसभेवर आपलाच झेंडा फडकवायचा आहे. शिट्ट्या टाळ्या वाजवू नका कामाला लागा.” असं म्हणत निलेश लंकेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

निलेश लंके जे बोलतो ते करुन दाखवतो

निलेश लंके जे बोलतो तेच करतो, जे करतो तेच बोलतो. मी पैलवान आहे, डायरेक्ट असा डाव टाकेन की पुढला आऊट. पण आज मी शरद पवारांमुळे खासदार झालो आहे. तात्यांना विचारलं माझं सर्टिफिकेट बदलणार नाही, तर ते नाही म्हणाले. मी दिसायला असा दिसतो आहे. पण पवारांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू आहे. आम्हाला आठ जणांना दिल्लीत पाठवलंय, आता बघा कसं काम आम्ही सगळे करुन दाखवतो. संसदेत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर संसदच बंद पाडेन. आमचं काम हटके आहे, हे लक्षात घ्या. असंही निलेश लंके म्हणाले. मला जरा दिल्लीला जाऊन तिथला अंदाज घेऊ द्या. मग आल्यावर सगळं काम करतो आहे लक्षात घ्या. शरद पवारांच्या आशीर्वादासाठी मी सगळं काही करेन. एक गोष्ट कुणीच विसरायची नाही. पवार इज द पॉवर. सगळ्यांचा नाद करायचा, सगळ्यांचा पण आदरणीय शरद पवारांचा नाद केला की ते घरी पाठवतात भल्याभल्यांना. हे एकमेव उदाहरण म्हणजे आपलं दैवत शरद पवार आहेत असंही निलेश लंके म्हणाले आहेत.