गडचिरोली जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या नऊ जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात चिरोली गावात एक महिलेला करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे गडचिरोलीत एकूण करोनाबाधितांची संख्या २४ तर चंद्रपूरात २२ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्यात आज एकूण ९ करोनाबाधित रुग्ण आढळले. या सर्वांची हिस्ट्री मुंबई येथून थेट गडचिरोली येथे आगमनाची आहे.  त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या ९ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या नऊ जणांचा इतरांशी संपर्क आला होता काय? हे सुध्दा बघितले जात आहे.

गडचिरोलीत मुंबई, पुणे, ठाणे येथून आलेले व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याामध्ये सोमवारी सायंकाळी आणखी एका रुग्णाची भर पडल्याने, करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता २२ झाली आहे. आहे. २३ मे रोजी या महिलेचा स्वॅब नमूना घेण्यात आला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील चिरोली येथील करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातीत २६ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. चंद्रपूरमध्ये २ मे -( एक रुग्ण ), १३ मे- ( एक रूग्ण) २० मे -( १० रूग्ण ) २३ मे-( ७ रूग्ण ) २४ मे -( २ रूग्ण ) आणि २५ मे -( एक रूग्ण ) अशा प्रकारे  करोनाबाधित २२ रुग्ण आढळले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine corona patients were found in one day at gadchiroli msr