सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह सिंधुदुर्ग नगरी मधील ई सेवा (सेतू सुविधा) केंद्र गुजरात कंपनी चालविणार आहे. तसा जिल्हा सेतू समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कार्यारंभ आदेश काढला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग नगरी व प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात ई सेवा केंद्र सुरू आहेत.अशा एकूण ९ सेतू सुविधा केंद्रे गुजराती कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुकास्तरीय व एक जिल्हास्तरीय असे ९ सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालय, आणि तालुका देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग ही नागरी सुविधा केंद्रे चालवण्यासाठी मे. गुजरात इन्फोटेक लि.अहमदाबाद यांना मंजुरी देण्यात आलेली आहे.मे. गुजरात इन्फोटेक लिमिटेड यांच्यासोबत करारनामा करण्यात आलेला आहे त्याला याबाबतच्या अटी व शर्ती मान्य असल्याचेही या आदेशात म्हटले आहे.

याबाबत कार्यारंभ आदेश ९ जानेवारी २०२५ ते ८ जानेवारी २०२८ चार देण्यात आला आहे. गुजरात इन्फोटेक लिमिटेड अहमदाबाद याना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुकास्तरीय व एक जिल्हास्तरीय असे नऊ सेतू सुविधा केंद्र( आपले सरकार सेवा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड ,वैभववाडी ,कणकवली, मालवण ,कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग हे नागरी सुविधा केंद्राचे कामकाज सुरू करण्यासाठी वर्क ऑर्डर आदेशान्वये मंजुरी देण्यात येत आहे असे जिल्हा सेतू समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी या आदेशात म्हटले आहे.

सेतू सुविधा केंद्र चालविताना भागधारक व महाऑनलाईन यांना राज्य सेतू सुविधा १ रूपया, जिल्हा सेतू सुविधा ५ रूपये, महाऑनलाईन ४ रूपये तर गुजरात कंपनी निविदा धारक १० रूपये वर्गीकरण करण्याला या कंपनीने स्विकृती दिली आहे असे या कार्यारंभ आदेशात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी म्हटले आहे. या सेतू सुविधा केंद्रात ४ किंवा ५ कर्मचारी आहेत. जिल्ह्यातील ९ केंद्रात ४० कर्मचारी असतील असे सांगण्यात आले.

कंपनी गुजरातची असलीतरी संबंधित महाराष्ट्रातील?

निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे दरम्यान निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, याबाबत पाच निविदा प्राप्त झाल्या होत्या. सन २०२२ पासून निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. ती सन २०२४ मध्ये मंजूर झाली. कंपनी गुजरात इन्फोटेक लि.अहमदाबाद या नावाने असलीतरी या कंपनीचे संबंधित महाराष्ट्रातील आहेत. या कंपनीने कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तहसीलदार कार्यालयात तर पुणे जिल्हात सेवा सुरू केली आहे. तसेच सध्या सेतू सुविधा केंद्रात असलेल्या कर्मचाऱ्यांकरवी ते काम पुढे सुरू ठेवतील. सेतू सुविधा केंद्रांची मुदत २०२२ मध्ये संपली होती. पुर्वीच्या निविदा धारकांना दोन वर्ष मुदतवाढ मिळाली होती ,असे त्यांनी सांगितले.

Story img Loader