Nirmala Sitharaman on Fadnavis elected as Leader of Maharashtra BJP Legislative Party : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला होता, ज्याला भाजपाच्या सर्व आमदारांनी व दिल्लीतल्या नेतृत्वाने पाठवलेल्या निरिक्षकांनी समर्थन दिलं आहे. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या व केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण देखील उपस्थित होत्या. यावेळी सीतारामण यांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांचं अभिनंदन केलं. तसेच विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती झालेल्या देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्या म्हणाल्या, “नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील १४ कोटी जनतेने एकमताने देशाला संदेश दिला आहे की त्यांना विकसित भारत हवा आहे. महाराष्ट्राची निवडणूक काही साधीसुधी नव्हती. लोकसभेनंतर झालेली ही महत्त्वाची विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं”.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निर्मला सीतारामण म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या व हरियाणाच्या जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे. निवडणुकीनंतर अनपेक्षित व अभूतपूर्व असा निकाल समोर आला आहे. हा विजय विकसित भारतासाठी स्पष्ट संदेश आहे. मागील निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकार अस्तित्वात आलं होतं. मात्र त्या सरकारने जे काही करून ठेवलंय त्या अनुभवातूनच राज्यातील जनतेने यावेळी स्पष्ट संदेश दिला आहे. जुनं सरकार महाराष्ट्राच्या विकासाच्या मार्गात अडथळा निर्माण करत होतं. म्हणूनच जनतेने आम्हाला निवडलं आहे. जनतेच्या मनात काय आहे ते निवडणुकीच्या निकालावरुन समजलं आहे. मला सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार देशाला पुढे नेत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र देखील प्रगती करत राहील”.

हे ही वाचा >> फडणवीसांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, महापौर ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री

मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होताच फडणवीस म्हणाले, “सर्वप्रथम मी सर्व आमदारांचे आभार मानतो. सर्व आमदारांनी एकमताने माझी गटनेतेपदी निवड केली. खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की या वेळची निवडणूक ही ऐतिहासिक राहिली. या निवडणुकीने आपल्या समोर एक गोष्ट ठेवली. ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरु झाली. महाराष्ट्राने जे बहुमत आपल्याला दिलं. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. खरं म्हणजे आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, त्यांचेही मी आभार मानतो”.